मुंबई

ई-बाईक सेवेला बेस्ट प्रवाशांची पसंती; एक लाखाहून अधिक प्रवाशांची नोंदणी

प्रतिनिधी

बसथांब्यापासून कार्यालय अथवा कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या सोयीसाठी ई-बाईक सेवा सुरू केली आहे. ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या ई-बाईक सेवेसाठी तब्बल एक लाखाहून अधिक प्रवाशांनी नोंदणी केल्याचे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

वाहतूक कोंडीतून सुटका, वेळेची बचत, सुरक्षित व प्रदूषणमुक्तीसाठी बेस्ट प्रवाशांच्या सेवेत ई-बाईकची संख्या वाढवण्यात येत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या १५ दिवसांत १८० बसथांब्यांवर एक हजार ई-बाईक सेवा सुरू करण्यात आली आहे. ई-बाईक सेवेसाठी एक लाखाहून अधिक प्रवाशांनी नोंदणी केली असून, जून २०२३ पर्यंत प्रवाशांच्या सेवेत ५ हजार ई-बाईक उपलब्ध असतील, असेही ते म्हणाले.

बसथांब्यावर उतरल्यावर प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी ई-बाईक सेवा उपलब्ध केली. प्रायोगिक तत्त्वावर अंधेरी पूर्व व पश्चिम येथे २२ जूनपासून ई-बाईक सेवा सुरू करण्यात आली. या ठिकाणी प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता आता १८० बस थांब्यांवर ई-बाईक सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. एक हजार ई-बाईक उपलब्ध झाल्या असून, कमर्शिअल व निवासी क्षेत्रात ही ई-बाईक सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भविष्यात ई-बाईक सेवा व बेस्ट बसची सुविधा एकत्र उपलब्ध करण्याचा प्रयत्न असल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगितले. वोगो कंपनीच्या ई-बाईक असून, बेस्ट उपक्रमाने वोगो कंपनीशी करार केल्याचे ते म्हणाले.

"तो मुलाच्या बर्थडे पार्टीचा प्लॅन करत होता, आता आम्ही त्याच्या अंत्यसंस्काराची योजना आखतोय": पूंछ हल्ल्यातील शहीद जवानाचे नातलग

जीवघेणा रेल्वे प्रवास; सर्वाधिक महसूल गोळा करणाऱ्या रेल्वेला प्रवाशांच्या जीवाचे मोल शून्य

आई-बापानेच मुलगी, नातवाच्या मदतीने केली स्वतःच्या मुलाची हत्या

तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला,मंगळवारी दिग्गजांचे भवितव्य ठरणार!

पत्रकाराच्या नावाने खंडणी उकळणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा