संग्रहित छायाचित्र  एएनआय
मुंबई

वरळीत उभारणार ‘ई’ लायब्ररी; आमदार सचिन अहिर यांनी केली पाहणी

वरळी येथील गांधीनगर परिसरात असलेल्या पालिकेच्या रिक्त भूखंडावर ‘ई’ लायब्ररी आणि उद्यान सुरू करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : वरळी येथील गांधीनगर परिसरात असलेल्या पालिकेच्या रिक्त भूखंडावर ‘ई’ लायब्ररी आणि उद्यान सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक आमदार सचिन अहिर यांचा विकास निधी वापरण्यात येणार आहे. निधी वापरण्यासाठी आपण यापूर्वीच मंजुरी दिली आहे. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे अद्याप काम सुरू झाले नाही. परंतु, पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असून काम लवकरच होईल, असे अहिर यांनी सांगितले.

वरळी गांधीनगर परिसरातील फोर सीजन हॉटेलच्या मागील बाजूस एल आर पापन मार्गावर १५५ चौरस मीटरचा एक भूखंड रिकामा आहे. या रिकाम्या भूखंडावर अतिक्रमण होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाकडून ‘ई’ लायब्ररी आणि उद्यान तयार करण्यात येणार आहे. या ‘ई’ लायब्ररीसाठी आमदार सचिन अहिर यांच्या विकास फंडातून तीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ‘ई’ लायब्ररी आणि उद्यानाचा आराखडा तयार करण्यात आला असून अन्य तांत्रिक बाबींची पूर्तता केली जात आहे. प्राथमिक स्वरूपाचे काम सध्या या ठिकाणी सुरू करण्यात आले असून या कामाची तसेच पुढील आराखड्याची पाहणी करण्याकरिता अहिर यांनी या जागेला भेट दिली. तसेच काम लवकरात लवकर सुरू करून विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशा ई लायब्ररीची सुरुवात करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

या लायब्ररीचा फायदा वरळीतील अनेक विद्यार्थ्यांना होणार आहे. या लायब्ररीकरिता शुल्क अगदीच नाममात्र असल्याने अनेक विद्यार्थी या लायब्ररीचा वापर करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. लवकरात लवकर ही लायब्ररी तयार होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

अशी दिसणार लायब्ररी

अर्ध वर्तुळाकार असे पारदर्शक छत असलेली रचना या ‘ई’ लायब्ररीची असणार आहे. या ठिकाणी ‘ई’ लायब्ररीसह अनेक पुस्तकेही ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थी आणि वाचकांसाठी हे निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास अहिर यांनी व्यक्त केला.

अशी आहे लायब्ररीची संकल्पना

पालिकेच्या रिकाम्या भूखंडावर ई लायब्ररी तयार करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना इथे अभ्यासक्रमासह अन्य पुस्तकेही वाचता येणार आहेत. तसेच किंडल आणि लॅपटॉपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुस्तके चाळता येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांकडून अत्यंत नाममात्र दरात म्हणजे ११ रुपये किंवा ५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. कारण त्यामुळे खरोखर गरजू इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल असेही अहिर म्हणाले.

त्याने बोलावल्यावर हॉटेलमध्ये का जायचीस? रेपचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टाने फटकारले

मंदिरात चोरी करायला गेला...पण, झोपेने घात केला! पुढे जे झालं ते...VIDEO व्हायरल

बुमराहने चौथी कसोटी खेळावी! संघाला गरज असताना विश्रांती घेणे चुकीचे; माजी क्रिकेटपटूंचे स्पष्ट मत

Health Tips : झोप पूर्ण होऊनही सारखी जांभई येते? वेळीच आजार ओळखा, 'हे' सोपे उपाय करा

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराचे उच्च न्यायालयाचे आदेश; "क्रूर आणि निर्दय वागणूक" असल्याचे निरीक्षण