मुंबई

मुंबई विमानतळावर ‘इकाई महाराष्ट्र’ खाद्यपदार्थ स्टॉल

नवशक्ती Web Desk

मुंबई : महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या स्वादिष्ट खाद्यपदार्थांची भुरळ संपूर्ण देशाला आहे. विदेशी मंडळी देखील बहुतांश वेळा महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थाच्या शोधात असतात. मुंबई विमानतळावर आतापर्यंत महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ उपलब्ध नसल्याने प्रवाशांमध्ये खंत होती. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांचा विचार करत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांची चव चाखण्याची सोय करण्यात आली आहे. विमान प्रवाशांना आता अस्सल महाराष्ट्रीयन स्वाद चाखता येणार आहे. मुंबई विमानतळ प्रशासनाने ‘इकाई महाराष्ट्र’ या अव्वल दर्जाच्या आलिशान मिठाई व नमकीन खाद्यपदार्थ स्टॉल सुरू केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रादेशिक खाद्यसंस्कृतीला चालणार मिळणार आहे.


मुंबई विमानतळ आशियातील सर्वाधिक गर्दीचे विमानतळ म्हणून पाहिले जाते. प्रतिदिन ८०० हून अधिक विमान उड्डाणे या विमानतळावरून होतात. मात्र दिवसेंदिवस विमानतळावरील प्रवासी संख्या वाढत आहे. त्यामुळे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांना आपल्या राज्यातील, आपल्या घरच्या पद्धतीने खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत यावा यादृष्टीने मुंबई विमानतळावर 'इकाई महाराष्ट्र' खाद्यपदार्थ स्टॉल सुरू करण्यात आला आहे. वन क्लिक इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेडला याचे कंत्राट देण्यात आले असून ही कंपनी देशभरातील मिठाई, नमकीन, स्नॅक्स व अनोख्या पाककृती एकत्र आणण्याच्या व्यवसायात आहे. त्यामुळे मुंबईबाहेर जाणारे प्रवासी आता प्रिझर्वेटिव मुक्त महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ सर्वत्र घेऊन जाऊ शकणार आहेत.

"आमच्यासोबत या, तुमची स्वप्नं पूर्ण होतील..."नंदुरबारमधील सभेत मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर

मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना 'सर्वोच्च' दिलासा; १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

Pradeep Sharma : एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर

Narendra Dabholkar Murder Case: दोघांना जन्पठेप, तिघांची निर्दोष सुटका; ११ वर्षांनी आला निकाल

Madhuri Dixitनं खरेदी केली तब्बल 4 कोटी रुपयांची कार, फीचर्स ऐकून व्हाल चकित