संग्रहित छायाचित्र  
मुंबई

शिंदे सेनेची नजर पालिकेवर; ३२ विभागप्रमुख व ३ विधानसभा प्रमुखांची नियुक्ती

मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर होणार, असा दावा भाजपचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत अधिकाधिक जागा निवडून आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबई महापालिकेवर फोकस केला आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर होणार, असा दावा भाजपचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत अधिकाधिक जागा निवडून आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबई महापालिकेवर फोकस केला आहे. एकनाथ शिंदे सेनेने रणनीती आखली असून ३२ प्रभारी विभागप्रमुख व ३ विधानसभा प्रमुखांची टीम मैदानात उतरवली आहे.

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने पूर्ण ताकदीनिशी पालिकेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या पक्षांचे संख्याबळ अधिक त्याचा महापौर होणार यासाठी भाजप व शिवसेना छुपी चाल खेळत आहे. भाजपचा महापौर व्हावा यासाठी भाजप नेते कामाला लागले असून शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाव्यात यासाठी शिवसेनेनेही कंबर कसली आहे. पालिका निवडणुकीत मतदारांपर्यंत पोहोचत त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे, त्यांच्या समस्या सोडवणे यासाठी शिवसेनेने ३२ प्रभारी विभागप्रमुख व ३ विधानसभा प्रमुख यांची नियुक्ती केली आहे.‌

प्रभारी विधानसभा प्रमुख

दिंडोशी गोरेगाव - गणेश शिंदे

विलेपार्ले - जितू जनावडे

वांद्रे पश्चिम - विलास चावरी

आजचे राशिभविष्य, ९ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका