मुंबई

'व्होट जिहाद'सारख्या वादग्रस्त वाक्यावर निवडणूक आयोग गंभीर; ६५० निवडणूक आचारसंहिता उल्लंघनाच्या प्रकरणांची नोंद

काही राजकीय पक्षांनी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वापरलेल्या "व्होट जिहाद" सारख्या वादग्रस्त शब्दप्रयोगाबाबत निवडणूक आयोगाच्या गंभीर असून आयोग त्याबाबत सखोल तपास करीत आहे.

Swapnil S

मुंबई : काही राजकीय पक्षांनी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वापरलेल्या "व्होट जिहाद" सारख्या वादग्रस्त शब्दप्रयोगाबाबत निवडणूक आयोगाच्या गंभीर असून आयोग त्याबाबत सखोल तपास करीत आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली. त्याचबरोबर राज्यातील निवडणुकीत तब्बल ६५० पेक्षा अधिक निवडणूक आचारसंहिता उल्लंघनाच्या प्रकरणांची नोंद झाली असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.

'व्होट जिहाद' बाबत विचारले असता कुलकर्णी म्हणाले, अशा शब्दांचे कायदेशीर, भाषिक आणि सामाजिक परिणाम काळजीपूर्वक तपासल्यानंतरच त्यावर पुढील कारवाई करणार आहे... 'व्होट जिहाद' सारख्या शब्दांबाबत आपल्याला खूप सावधगिरी बाळगली पाहिजे कारण त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

अशा वादग्रस्त शब्दांचा निवडणुकीतील प्रचारावर काही परिणाम झाला का, असा प्रश्न विचारल्यावर कुलकर्णी यांनी याबाबत कोणताही निष्कर्ष काढण्याचे टाळले. नवीन शब्दसंग्रहासाठी कोणतीही अशी एक कठोर कायदेशीर चौकट नाही, म्हणून अशा गोष्टींचे दुरगामी परिणाम लक्षात घेऊनच त्या काळजीपूर्वक हाताळल्या पाहिजेत. न्यायालये निवडणूक संबंधित गुन्ह्यांबाबत गंभीर आहेत, आणि आम्ही लवकर निकालासाठी प्रयत्न करत आहोत, असे ते म्हणाले.

द्वेषभाषेच्या काही तक्रारींची तपासणी केली गेली आणि संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार काही प्रकरणेही दाखल केली गेली आहेत. मात्र, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट हा कायदा नाही, तर विविध कायद्यांचा आधार घेऊन तयार केलेले सर्वमान्य मार्गदर्शक तत्व आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

राज्यातील विधानसभेची निवडणूक अलिकडेच पार पडली आहे. यावेळी प्रचारादरम्यान महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक केली. यावेळी व्होट जिहाद सारखा वादग्रस्त शब्दप्रयोग वापरण्यात आला होता.

'व्होट जिहाद' शब्दाचा अभ्यास आवश्यक

'व्होट जिहाद' हा एक नवीन शब्द आहे, ज्यावर सखोल अभ्यास आवश्यक आहे. त्यात कायदेशीर, भाषिक, सामाजिक आणि धार्मिक पैलू विचारात घेतले जाणार आहेत. निवडणूक आयोगाचे अधिकारी यावर अभ्यास करीत आहेत आणि या सर्व पैलूंचा सखोल पुनरावलोकन केल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल.

राज्यात निवडणूक संहिता उल्लंघनाच्या एकूण ६५९ प्रकरणांची नोंद झाली आहे. यापूर्वी २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नोंदवलेल्या ३६६ प्रकरणांच्या तुलनेत ही संख्या खूप जास्त आहे. आमच्या तपास यंत्रणांनी लोकसभा प्रकरणांमध्ये उत्तम काम केले आहे आणि ३०० चार्जशीट्स कोर्टात दाखल केल्या आहेत,"

- डॉ. किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती

आंदोलनामुळे हॉटेल, दुकाने बंद; आंदोलकांची झाली गैरसोय, सोबत १५ दिवसांची शिदोरी...

CSMT टाळण्याचे प्रवाशांना रेल्वेचे आवाहन; मराठा आरक्षण आंदोलनामुळे दक्षिण मुंबई ठप्प