प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

एलफिन्स्टन येथे उभारला जाणार पहिला डबलडेकर पूल

एलफिन्स्टन रोडवरील १२५ वर्षांहून जुना रोड ओव्हर ब्रिज (ROB) पाडून त्याऐवजी महाराष्ट्र रेल्वे पायाभूत विकास महामंडळ (MahaRail) डबलडेकर पूल उभारणार आहे. या प्रकल्पामुळे शिवडी-वरळी उड्डाणपूल ते अटल सेतू (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) पर्यंत थेट जोडणी होणार असून मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

Swapnil S

स्विटी भागवत / मुंबई

हा पूल १३२ मीटर लांबीचा असून खालच्या डेकवर २+२ लेनसह पादचारी मार्ग, तर वरच्या डेकवर २+२ लेन अशी रचना असेल. ओपन वेब गिर्डर प्रकारातील हा पूल अंदाजे १६७कोटी रुपयांत उभारला जाणार असून कामाला सर्व परवानग्या मिळाल्यानंतर साधारण वर्षभरात तो पूर्ण होईल.

ब्रिटीश काळात १९१३ मध्ये बांधण्यात आलेला एल्फिन्स्टन पूल आजवर महत्त्वाचा पूर्व-पश्चिम दुवा होता. वाढत्या लोकसंख्या व वाहतुकीच्या दबावामुळे त्याचे आधुनिकीकरण आवश्यक ठरले.

महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जायसवाल यांनी सांगितले की, मुंबईतील पहिले डबलडेकर रेल्वे पूल बांधणे हा अभियांत्रिकीचाच नव्हे तर शहराच्या आधुनिकीकरणाचाही मैलाचा दगड ठरेल.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • डबलडेकर डिझाइन - मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावरून जाणारा अनोखा पूल

  • लांबी - १३२ मीटर

लेनची रचना

  • खालचा डेक : २+२ लेन + पादचारी मार्ग

  • वरचा डेक : २+२ लेन (पादचारी मार्गाशिवाय)

  • प्रकार - ओपन वेब गिर्डर, मजबूत व टिकाऊ रचना

  • अंदाजित खर्च - ₹ १६७.३५ कोटी

  • पूर्णत्व कालावधी - साधारण १ वर्ष (परवानगी मिळाल्यानंतर)

Mumbai : 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ होणार कमी

टीएमटीच्या ताफ्यात पहिली डबलडेकर ई-बस दाखल

Pune : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; खंडाळा घाटात वाहनांच्या रांगा, खासदार सुप्रिया सुळेही दोन तास अडकल्या, VIDEO

Navi Mumbai : डीपीशेजारी कचरा टाकू नका, गाड्या पार्क करू नका; महावितरणचे आवाहन

मानखुर्दमध्ये क्रेन दुर्घटना : कंत्राटदाराला एक कोटींचा दंड