मुंबई

मीठ, साखरेचा अतिवापर आरोग्याला धोकादायक; BMC राबवणार जनजागृती अभियान

Krantee V. Kale
जागतिक आरोग्य संघटना आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संयुक्तपणे करण्यात आलेल्या स्टेप्स सर्व्हे २०२१ नुसार, मुंबईतील नागरिकांमध्ये ३४% उच्च रक्तदाब आणि १८% मधुमेहाचे प्रमाण आढळून आले आहे.
मीठ व साखर यांच्या अतिवापरामुळे उच्च रक्तदाब, मधूमेह, हृदयविकार यासारखे गंभीर आजार होण्याचा धोका असतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, भारतीय व्यक्ती अपेक्षित "५ ग्राम" मिठापेक्षा जास्त मिठाचे सेवन करत असल्याचे समोर आले आहे.
मुंबईकर प्रतिदिन ९ ग्रॅम मीठाचे सेवन करतात. मुंबईकर नागरिकांनी मिठाच्या सेवनाचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे. अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली
भविष्यातील पिढ्यांमध्ये असंसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी मीठ आणि साखरेच्या अतिरिक्त सेवनाबाबत जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.
रोजच्या आहारात मीठ व साखरेचे प्रमाण कमी करण्याबाबत नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे. समुदाय स्तरावर व शाळा येथे अतिरिक्त मीठ व साखर याबाबत जनजागृती करून लहान वयातच आरोग्यदायी सवयी रुजवण्याचे महत्त्व सांगितले जाणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
विविध देशात केलेल्या संशोधनाद्वारे असे आढळून आले की, लहान वयात मीठाचा वापर कमी केल्याने तरुण वयात उच्च रक्तदाब, मधूमेह व हृदयविकार इत्यादी आजार होण्याचा धोका कमी करता येतो.
जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून व मे महिन्यात साजरा करण्यात येणाऱ्या मीठ जनजागृती अभियानाचा आठवडा च्या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच पार्टनरशीप फॉर हेल्दी सिटीज आणि अमेरिकेअर्स इंडिया यांच्या सहकार्याने “मीठ व साखर जनजागृती” अभियान राबविण्यात येणार आहे.
समाजामध्ये जागरुकता निर्माण करण्याकरीता मराठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी यांच्या सहभागाने चित्रफित बनविण्यात आली असून सदर चित्रफितीचे प्रसारण करण्यात येईल. डिजिटल प्लॅटफॉर्म, शालेय व महाविद्यालयीन शेफ, रेस्टॉरंटचे कर्मचारी व महिलांसाठी आहारतज्ञ यांच्यामार्फत संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

एकनाथ शिंदेंच्या 'त्या' वक्तव्यावर सुषमा अंधारेंचा पलटवार; म्हणाल्या, "तुम्हाला आनंद दिघेंची शपथ...

Tarique Rahman : १७ वर्षांनंतर बांगलादेशात घरवापसी करणारे तारिक रहमान नेमके कोण?

उबर-ओला-रॅपिडोसाठी केंद्र सरकारचा नवा नियम; महिला प्रवाशांसाठी खास सोय, राईडआधी टिप मागितली तर...

१४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी; ३६ चेंडूंमध्ये ठोकले तुफानी शतक, एकाच सामन्यात मोडले दिग्गजांचे रेकॉर्ड्स

Navi Mumbai Airport : पहिल्या दिवशी ३० विमानांची ये-जा; आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक कधीपासून? CIDCO उपाध्यक्षांनी दिली माहिती