मुंबई

जहांगीर आर्ट गॅलरीत पेपर कोलाजचे चित्रप्रदर्शन

प्रतिनिधी

मथुरा येथील प्रख्यात कोलाज कलाकार उमा शर्मा यांच्या पेपर कोलाज कलाकृतींची मेजवानी मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. जगातील सर्वात मोठे पेपर कोलाज चित्रप्रदर्शन मंगळवारपासून म्हणजेच ७ ते १३ जून या कालावधीत जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे सुरू होणार आहे. सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. 'कागज की जुबानी' या धर्म या विषयातून प्रेरणा घेत केलेल्या कोलाज चित्रांचे सादरीकरण कलाकार उमा शर्मा यांनी केले असून, प्रदर्शनात लहान आकारापासून ते मोठ्या आकाराच्या कोलाजपर्यंत ८० हून अधिक कलाकृती रसिकांना पाहता येणार आहेत.

पेशाने कला शिक्षिका असलेल्या उमा शर्मा यांनी पेपर कोलाज या प्रकारात नैपुण्य प्राप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी आपला ठसा उमटवत अनेक नवोदित कलाकारांना प्रोत्साहन दिले आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स पुरस्कार, विशिष्ट कलाकार सन्मान, ब्रिज विभूती सन्मान, विशिष्ट शिल्प, उत्तर प्रदेश राज्य पुरस्कार इत्यादी अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत