मुंबई

शिवराज्याभिषेक अनुभवा लाईट अँड साऊंड शोद्वारे: फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण; प्रोजेक्शन मॅपिंग पाहण्याची सुविधा

Swapnil S

मुंबई : मुंबईत स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उद्यानात शिवराज्याभिषेक, रामायणातील प्रसंग, लोकमान्य टिळक यांचा जीवनपट आणि मुंबई शहराची झलक हे सर्व काही आता लाईट अँड साऊंड शोच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डी विभागाच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या या प्रकल्पाचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. याच ठिकाणी तयार करण्यात आलेल्या ग्लो पार्कचे लोकार्पणही यानिमित्ताने झाले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या कामाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी कौतुक केले. तसेच येत्या काळात विविध थोर पुरुष आणि विविध विषयांवर आधारित लाईट अँड शो प्रोजेक्शन मॅपिंगच्या माध्यमातून पाहायला मिळतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त शहर डॉ. अश्विनी जोशी, उपायुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे, डी विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे, लोकमान्य टिळक ट्रस्टचे पदाधिकारी यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी फडणवीस म्हणाले की, स्वराज्यभूमी येथे सुशोभीकरणाच्या कामासाठी तसेच याठिकाणी नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधेसाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सतत पाठपुरावा केला आहे. विविध सेवा सुविधा देण्याचा विषय त्यांनी उचलून धरला. तसेच मुंबई शहराचे पालकमंत्री केसरकर यांनीही या कामात योगदान दिले आहे.

मुंबई महानगरातील नागरिक आणि मुंबईत येणारे पर्यटक स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे आवर्जून येतात. स्वराज्यभूमीवरच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे स्मारक व पूर्णाकृती पुतळादेखील आहे. हा परिसर उद्यानाच्या स्वरूपात पूर्वीपासून विकसित आहे. सदर ठिकाणाचे महत्त्व लक्षात घेता, याठिकाणी प्रोजेक्शन मॅपिंगसह लाईट अँड साऊंड शो सुरू करण्याचा तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उद्यानाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेने घेतला.

यावेळेस लाभ घेता येणार

शनिवार आणि रविवार, सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस तसेच स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हे प्रोजेक्शन मॅपिंगचे चलचित्र दाखवण्याचे प्रस्तावित आहे. सायंकाळी ७ ते रात्री १० वेळेत या कालावधीत प्रोजेक्शन मॅपिंग दाखवण्यात येईल.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त