मुंबई

एक्स्प्रेसमध्ये गोळीबार प्रकरण :आरोपीच्या कोठडीत ११ ऑगस्टपर्यंत वाढ

यापूर्वी न्यायालयाने ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती

नवशक्ती Web Desk

मुंबई : पालघरजवळ जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंहच्या पोलीस कोठडीत बोरिवलीतील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने ११ ऑगस्टपर्यंत वाढ केली.
कॉन्स्टेबल चेतन सिंहने केलेल्या गोळीबारात आरपीएफमधील सहाय्यक उपनिरीक्षकासह चौघांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गाडीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सिंहला मीरा रोड येथून अटक करण्यात आली होती. यापूर्वी न्यायालयाने ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. ही मुदत सोमवारी संपल्याने सिंहला बोरिवली दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि काही साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याने अधिक तपासासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती केली. ती मान्य करत न्यायालयाने ११ ऑगस्टपर्यंत पोलीस काठडी सुनावली.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

एका फ्लॅटमुळे संपूर्ण इमारतीचा पुनर्विकास रोखू शकत नाही - मुंबई उच्च न्यायालय

Mumbai : पिसे पांजरपोळ जलबोगद्याला मंजुरी; पाणीगळती, पाणी चोरीच्या घटनांना लगाम

उल्हासनगरात डेंग्यूचा पहिला बळी; १७ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू