प्रातिनिधिक फोटो
मुंबई

सीडीओईच्या पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ; १६ ऑगस्टपर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातील पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. आता १६ ऑगस्ट २०२४ पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातील पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. आता १६ ऑगस्ट २०२४ पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत.

पदवीस्तरावरील प्रथम वर्ष बी.ए., बी.कॉम., बी.कॉम.(अकाऊंटिंग अँड फायनान्स), बी.एस्सी (माहिती तंत्रज्ञान), बी. एस्सी(संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २६ जून २०२४ पासून सुरु करण्यात आली आहे. तसेच व्दितीय व तृतीय वर्ष : बी.ए., बी.कॉम., बी.कॉम. (अकाऊंटिंग अँड फायनान्स), बी.एससी (माहिती तंत्रज्ञा, बी.एससी. (संगणकशास्त्र), एम.ए. (इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी), एम.ए. (भूगोल), एम.ए. (शिक्षणशास्त्र), एम.ए. (मानसशास्त्र), एम.ए. (संज्ञापन आणि पत्रकारिता), एम.ए. (जनसंपर्क, एम.कॉम. (अकाऊंट्स), एम.कॉम. (व्यवस्थापन), एमएमएस, एम.एस. सी. (गणित), एम. एस. सी. (माहिती तंत्रज्ञान), एम. एस. सी. (संगणकशास्त्र) एमसीए व प्रथम व द्वितीय वर्ष एमएमएस आणि एमसीए प्रथम व द्वितीय वर्ष या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांना नियमित महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही किंवा ज्यांचे शिक्षण अपूर्ण राहिले आहे अश्या विद्यार्थ्यांसाठी दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण प्रणाली हा एक योग्य पर्याय असून यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन सीडीओईचे संचालक प्रा. शिवाजी सरगर यांनी केले आहे.

पालघर येथेही लवकरच विभागीय केंद्र

सीडीओईचे चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी येथे विभागीय केंद्रे असून या ठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण होणार आहे. पालघर येथेही लवकरच विभागीय केंद्र सुरू होणार आहे.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या