मुंबई

एकाच दिवसात दोन हजार उंदरांचा खात्मा; दादर, माहीम, धारावीत कीटकनाशक विभागाची मोहीम

Swapnil S

मुंबई : लेप्टोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेच्या कीटकनाशक विभागाने मिशन उंदीर हाती घेतले आहे. या मिशन अंतर्गत पालिकेच्या जी उत्तर अर्थात दादर, माहीम व धारावीत एकाच दिवशी तब्बल २,०८० उंदरांचा खात्मा केला आहे. पालिकेच्या कीटकनाशक विभागाची ही मोहीम आजपर्यंत कामातील सर्वात मोठी मोहीम असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येतात. लेप्टोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशक विभागाने मिशन उंदीर मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांकडून प्राप्त तक्रारींनुसार, घरांमध्ये मूषक सापळे लावून अथवा घराबाहेरील परिसरात बिळांमध्ये नाशक गोळ्या टाकून मूषक नियंत्रणाची कार्यवाही नियमितपणे केली जाते. मूषकांचा उपद्रव असलेल्या परिसरात सर्वेक्षण घेऊन त्या ठिकाणी मूषक नियंत्रणाची विशेष मोहीम राबविली जाते.

कीटकनाशक विभागाने ‘जी उत्तर’ विभागातील दादर, माहीम आणि धारावी परिसरात मूषक नियंत्रण विशेष मोहीम हाती घेण्यात आली. त्या अंतर्गत या परिसरातील एकूण ९,०६५ बिळांमध्ये झिंक फॉस्फाईड व सेलफॉस आणि ५५ किलो गव्हाच्या पिठाचे मिश्रण असलेल्या गोळ्या टाकण्यात आल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २,०८० मृत मूषक गोळा करण्यात आले. या परिसरामध्ये फेब्रुवारी २०२३ पासून आतापर्यंत अशाप्रकारच्या चार विशेष मोहिमा राबविण्यात आल्या असून इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच मूषकांचा नायनाट करण्यात आला आहे.

१६ पर्यवेक्षक, ४५ कामगारांनी फत्ते केली मोहीम

'जी उत्तर’ विभागाचे कीटक नियंत्रण अधिकारी, १३ पर्यवेक्षकीय कर्मचारी आणि ४५ कामगारांच्या चमूने नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करत ही कार्यवाही पूर्ण केली.

"एकनाथ शिंदेंना अपमानित करायचं नव्हतं..." देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

"उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच", चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी, तब्बल १०७ कोटी रुपये किंमतीचं ड्रग्ज जप्त, राजस्थानमधील ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश

ज्याला देव मानलं त्यानंच केला घात... नराधम शिक्षकानं अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला बलात्कार

लॉटरीच की! फक्त ९ हजारात मिळतोय सॅमसंगचा 'हा' 5G स्मार्टफोन; जाणून घ्या काय आहे फीचर्स?