मुंबई

सुरक्षा नोंदणी प्लेट्ससाठी बनावट लिंक; सायबर फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (एचएसआरपी) नोंदणीसाठी बनावट लिंक तयार करून वाहनमालकांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

Swapnil S

मुंबई : वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (एचएसआरपी) नोंदणीसाठी बनावट लिंक तयार करून वाहनमालकांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात सायबर गुन्हेगारांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

महाराष्ट्र परिवहन विभागाने एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत असलेल्या वाहनांसाठी ३० एप्रिल २०२४ पर्यंत सुरक्षा नोंदणी पाटी बसविणे अनिवार्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, वाहनांशी संबंधित गुन्हे रोखण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे. त्यानुसार, राज्यात वाहनांच्या नंबर पाट्या बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. वाहनमालकांना एचएसआरपी नोंदणी सोपी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने परिवहन विभागाच्या वेबसाइटवर अधिकृत लिंक उपलब्ध करून दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिवहन विभागाने या कामासाठी रोस्मर्टा सेफ्टी सिस्टीम लिमिटेड, रिअल मेझॉन इंडिया लिमिटेड आणि एफटीए एचएसआरपी सोल्यूशन्स लिमिटेड या तीन कंपन्यांची निवड केली आहे. यापैकी रोस्मर्टा आणि रिअल मेझॉनने तक्रार केली की बनावट नोंदणीसाठी फसवे संकेतस्थळ तयार केले आहेत.

विधिमंडळाचे आजपासून हिवाळी अधिवेशन; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार; महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेतेपद रिक्त

हाऊसिंग सोसायटी समितीची सदस्यसंख्या दोन-तृतीयांशपेक्षा कमी होते, तेव्हा समिती आपोआप कायदेशीर स्थान गमावते : HC

मुंबई विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेत मराठीत विचारण्यात येणार प्रश्न; विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

जपान-चीनमध्ये तणाव! चीनने जपानी लढाऊ विमानाचे रडार केले ‘लॉक’

दुचाकी वाहनांनाही पसंतीचा नोंदणी क्रमांक मिळणार; RTO कडून प्रक्रिया सुरू, एकाच क्रमांकासाठी जास्त अर्ज आल्यास लिलाव