मुंबई

सज्जन जिंदाल यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले; निवेदन जारी करत म्हणाले...

Swapnil S

JSW स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल यांच्यावर मुंबईतील एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. त्यांच्यावर केल्या गेलेल्या आरोपांवर त्यांनी मौन सोडलं आहे. जिंदाल यांनी आज(१७ डिसेंबर) एक निवेदन जारी केलं असून यात त्यांनी आपल्यावर केले गेलेले आरोप हे खोटे आणि निराधार असल्याचं म्हटलं आहे.

आपल्या खासगी निवेदनात सज्जन जिंदाल यांनी म्हटलंय की, "श्री सज्जन जिंदाल हे खोटे आणि निराधार आरोप फेटाळून लावतात. ते संपूर्ण तपासात सहकार्य करण्यास कटीबद्ध आहेत. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याने आम्ही सध्या यावर भाष्य करु इच्छित नाही. यावर योग्य वेळी भाष्य केलं जाईल. आमच्या कुटुंबीयांच्या गोपनियतेचा आदर करा, अशी आपणास विनंती करतो."

काय आहे प्रकरण?

एका महिलेने JSW समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. १६ फेब्रुवारी २०२३ रोजी या प्रकरणाची तक्रार बीकेसी पोलीस ठाण्यात करण्यात आली. तसंच या प्रकरणी १३ डिसेंबर रोजी बीकेसी पोलीस ठाण्यात कलम 376, 354 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना बीकेसीमधील JSW कंपनीच्या मुख्य कार्यालयाच्या वर असलेल्या पेंट हाऊसमध्ये घडली. या वर्षाच्या सुरुवातीला या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने आपल्याला कोर्टात जावं लागल्याचं महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. जिंदाल यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर आणि या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ही घटना 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर झाली.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला असून या प्रकरणी सज्जन जिंदाल यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल