मुंबई

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एफडीए अलर्ट;मस्जिद बंदर येथून तीन लाखांचे भेसळयुक्त तूप जप्त

दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयाने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तुपावर कारवाई केली

प्रतिनिधी

दिवाळी सणात भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानदारांवर अन्न व औषध प्रशासन विभागाची करडी नजर आहे. मस्जिद बंदर चिंचबंदर येथील दुकानात ४०० किलो २ लाख ९९ हजार ९० रुपये किमतीचे भेसळयुक्त तूप जप्त केले आहे, तर तीन नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासन मुंबईचे सहआयुक्त शशिकांत केंकरे यांनी सांगितले.

दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयाने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तुपावर कारवाई केली आहे. १८ ऑक्टोबर रोजी मुंबईतील प्रशासनाच्या दक्षता विभागास मिळालेल्या माहितीच्या आधारे मस्जिद बंदरमधील ऋषभ शुद्ध घी भांडार गोडाऊन, पहिला मजला, १५, श्रीनाथजी बिल्डिंग, केशवजी नाईकरोड, चिंचबंदर येथील ३ तुपाचे अन्न नमुने विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित ४०० किलो २ लाख ९९ हजार ९० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त अन्न नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून, विश्लेषण अहवालानंतर पुढील आवश्यक कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

BMC शाळांतील विद्यार्थी जाणार सिंगापूरला; वैज्ञानिक क्षेत्रातील अनुभव घेत भरारी घेणार; ३५ विद्यार्थी अन् पाच शिक्षकांचा सहलीत समावेश

Thane : एक लाखावरील थकबाकीदारांना नोटीस; २४५ कोटींची थकबाकी; नळजोडणी खंडित करण्याचा इशारा

Lucknow Crime : लग्नाला नकार दिल्याने संताप अनावर; घरात घुसून तरुणीवर ॲसिड हल्ला, आई-वडिलांवर चाकूने वार

मीरा-भाईंदरला ५० ते ६० एमएलडी पाणी मिळणार; सूर्या जलवाहिन्यांचे फ्लशिंग पुढील आठवड्यापासून

Himachal Pradesh : जमिनीपासून हजारो फूट उंचीवर बर्थडे सेलिब्रेशन; पॅराग्लायडिंग करत महिलेने कापला केक, VIDEO व्हायरल