मुंबई

एफडीएचे धाडसत्र सुरूच;मुंबईतून एक कोटींचे भेसळयुक्त तेल जप्त

प्रतिनिधी

दिवाळी सणात घराघरात मिठाई, खाद्यपदार्थ बनवले जातात. दिवाळी फराळ बनवताना भेसळयुक्त पदार्थांमुळे मुंबईकरांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे. दहिसर, कुर्ला, भायखळा, गोवंडी व घाटकोपर येथे धाड टाकून तब्बल १ कोटी ४ लामख १४ हजारांचे भेसळयुक्त तेल जप्त केले आहे, तर चेंबूर छेडा नगर येथून २३ लाख ७१ हजार २६९ रुपयांची मावा चॉकलेट बर्फी, कतली पाईनॅपलचा साठा जप्त करण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त शशिकांत केकरे यांनी सांगितले. दरम्यान, ग्राहकांना सुरक्षित, आरोग्यदाई व सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत या करीता अन्न व औषध प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असते.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या गुप्त वार्ता विभागास मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर येथील अँग्रो आईल, कुर्ला ट्रेंड्सॅ, भायखळा येथील इंदू ऑईल अँड सोप्स व घाटकोपर येथील जय बजरंग आईल डेपो या ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी सनफ्लावर आईल, वनस्पती तेल, सोयाबीन आईल असा १ कोटी ४ लाखांचा ५१ हजार १४८ किलोचा साठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, दोन्ही ठिकाणी छापा टाकून जप्त केलेल्या मालाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान, ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री संजय राठोड व आयुक्त अभिमन्यू काळे (भा.प्र.से.) यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कायद्यातील तरतुदीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अन्न व्यावसायि-काविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य विभागाला कळविले आहे.

२३ लाखांचा मिठाईचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागातील गुप्त वार्ता विभागास प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बृहन्मुंबई कार्यालयाने मे. स्वीट्स म्यान्युफॅक्चरिंग युनिट चे मालक शाहीद हुसेन कविरुद्दिन शेख, रूम नं. ७ ते ११, प्लॉट न. १८५७, लक्की वे ब्रिज, चेंबुर मानखुर्द लिंक रोड, चेंबुर छेडानगरजवळ या ठिकाणी धाड टाकून सदर आस्थापनेची सखोल तपासणी केली असता अस्वच्छ वातावरणात व विनापरवाना मिठाईचे उत्पादन सुरू असल्यामुळे खालील अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. मावा चोकोलेटबर्फी, चांदीच्या वर्खासह, मावा पेढा, मावा फॅन्सी, काजु फॅन्सी, काजू कतली, काजु कतली पाईनापल, मावा कुंदा, रिच स्वीट डीलाइट अँनालॉग, लेमन येल्लो पावडर, रॉ कँशू नट या अन्न पदार्थांचे अन्न नमुने घेतल्यानंतर सर्व अन्न पदार्थाचा उर्वरित साठा एकूण २३ लाख ७१ हजार २६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुंबईत २७ ते २९ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा; 'असा' बचाव करा

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात ६१ टक्के मतदान; उत्तर प्रदेशात सर्वात कमी प्रतिसाद, तर 'या' राज्यात सर्वाधिक टक्केवारी

जरांगे-पाटील उतरणार विधानसभेच्या मैदानात, राज्यात २८८ जागांवर उमेदवार देणार; प्रस्थापितांना धक्के बसणार?

आता शेतकऱ्यांना मिळणार केवळ ५ मिनिटांत कर्ज; नाबार्ड-आरबीआय इनोव्हेशन हब यांच्यात करार

दुसऱ्या टप्प्यातही यादीत घोळ; अनेकजण मतदानाविना परतले, प्रशासनाची अनास्था कायम