मुंबई

मुंबईच्या जोगेश्वरीतील हिरापन्ना मॉलला भीषण आग ; अग्निशमन दल घटनास्थळी पोहचलं

ही आग आज(२२ सप्टेंबर) दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास लागल्याची माहिती समोर आली आहे.

नवशक्ती Web Desk

मुंबईतील जोगेश्वरी पश्चिमेला असलेल्या हिरापन्ना मॉलमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग आज(२२ सप्टेंबर) दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास लागल्याची माहिती समोर आली आहे. ही आग इतकी भीषण आहे की, दुरुनच धुराचे लोट दिसत आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी पोहोचले आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे. आग नेमकं कोणत्या कारणाने गागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

मॉलला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी पोहचल्या. त्याच बरोबर मुंबई पोलीस आणि रुग्मवाहिका देखील घटनास्थळी पोहचली आहे. या मॉलमधून मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट बाहेर पडत असून मॉलमध्ये कोणी अटकलं आहे का? याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

मराठवाड्यात कोसळधार! ढगफुटी सदृश्य पावसाने गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

Thane First Metro : ठाणे मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी यशस्वी; कशी आहे ठाणेकरांची पहिली मेट्रो, जाणून घ्या

मुंब्रा बायपासवर भीषण अपघात; कंटेनर ट्रकची दुचाकीला धडक, ३ तरुणांचा मृत्यू

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सुप्रीम कोर्टाचा दणका; २०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात दिलासा नाही

कारचालकाने अचानक ब्रेक दाबला अन्...; मुलुंड टोलनाक्याजवळ अपघात, ८ ते ९ वाहने एकमेकांना आदळली