मुंबई

पवई हिरानंदानी येथील हायको सुपरमार्केटमध्ये आग

पवई, हिरानंदानी संकुल येथे तळमजला अधिक पाच मजली ‘हायको सुपारमार्केट’ आहे.

प्रतिनिधी

पावसाने मुंबईत दमदार हजेरी लावल्यानंतर पडझडीच्या घटनांचे सत्र सुरू झाले आहे. घरे, इमारत, झाडे कोसळण्याच्या घटना सुरू असताना पवई हिरानंदानी येथील हायको सुपरमार्केटमध्ये गुरुवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. मात्र सकाळची वेळ असल्याने मार्केट बंद होते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

पवई, हिरानंदानी संकुल येथे तळमजला अधिक पाच मजली ‘हायको सुपारमार्केट’ आहे. मार्केट इमारतीमधील पाचव्या मजल्यावरून धूर येऊ लागला. पाठोपाठ मार्केटमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. आगीबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचे काम सुरू केले. मात्र अवघ्या एका तासातच म्हणजे सकाळी ७.०५ च्या सुमारास आग भडकली. त्यामुळे अग्निशमन दलाने सदर आग ‘स्तर -२’ची असल्याचे जाहीर केले.

अग्निशमन दलाची यंत्रणा अपुरी पडू लागल्याने आणखी यंत्रणा मागवण्यात आली. दलाकडून ८ फायर इंजिन, ५ जम्बो वॉटर टँकर यांच्या सहाय्याने आगीवर ११.१ वाजताच्या सुमारास नियंत्रण मिळवले. दरम्यान, आगीच्या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. घटनास्थळी पोलीस, पालिका एस. विभागाचे ५ कामगार उपस्थित होते. आग कशी लागली याबाबतचे कारण समजू शकलेले नाही.

Mumbai : खार येथील जान्हवी कुकरेजाच्या आईची उच्च न्यायालयात धाव; मैत्रीण दिया पडळकरच्या निर्दोष सुटकेला आव्हान

मुंबईत सर्वसामान्यांसाठी २ हजार ६४० घरे; आजपासून म्हाडाचा अर्ज भरता येणार

मुंबई एअरपोर्टवर १० रुपयांत चहा; राघव चड्ढांचा उडान यात्री कॅफेतील अनुभव चर्चेत, पाहा Video

Mumbai : मालमत्ता करासाठी अखेरचे दोन दिवस; सुविधा केंद्र रात्री १२ पर्यंत सुरू राहणार

सायबर फसवणुकीवर लगाम; RBIकडून ऑनलाइन पेमेंटच्या नियमांत बदल, १ एप्रिलपासून नवे सुरक्षा नियम लागू