प्रातिनिधिक फोटो
मुंबई

वांद्रे येथील २० मजली इमारतीत अग्निभडका; ५० वर्षीय व्यक्तीचा होरपळून मृत्यू , एकाची प्रकृती चिंताजनक

वांद्रे-कुर्ला संकुलातील तळ अधिक २० मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील वातानुकूलित यंत्रणेत बिघाड झाला आणि आग लागली.

Swapnil S

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील तळ अधिक २० मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील वातानुकूलित यंत्रणेत बिघाड झाला आणि आग लागली. काही वेळात आग वाऱ्यासारखी पसरली आणि इमारतीत धुराचे लोट पसरले. यामुळे इमारतीतील लोकांनी खालील मजल्यावर धाव घेतली. यात दोघेजण अडकले व होरपळले गेले. यात तारानाथ (५०) हे ७० टक्के भाजले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, दुसऱ्या जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘जी ब्लॉग १’ येथे तळ अधिक २० मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका रूममध्ये शनिवारी मध्यरात्री ३.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. काही वेळातच आग वाऱ्यासारखी पसरली आणि इमारतीत एकच खळबळ उडाली. दुसऱ्या मजल्यावरील एसीच्या यंत्रणेत काही बिघाड झाला आणि आग लागली, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, या घटनेत सुनीत पाल (३०) हे ८० टक्के भाजले असून, तारानाथ (५०) हे ७० टक्के भाजले. दोघा जखमींना जवळील केएलएस या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तारानाथ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर पाल यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले