मुंबई

वरळी सी फेस येथील इमारतीत अग्निभडका

प्रतिनिधी

मुंबई : वरळी सी फेस येथील तळ अधिक दोन मजली इमारतीच्या तळघरात मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या दुर्घटनेत इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

वरळी सी फेस, डॉ. आर. जी. तंडानी मार्ग, बेनरिझ अपार्टमेंट ही तळ अधिक दोन मजली इमारत आहे. चार हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या तळ घरात मंगळवारी रात्री अग्नी भडका उडाला. यावेळी इमारतीतील पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर काही रहिवासी अडकले होते. मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. बचावकार्य दरम्यान अडलेल्या ६ रहिवाशांना जवानांनी सुखरुप बाहेर काढले. एक महिला व पाच पुरुषांची सुखरुप सुटका करण्यात आली असून, या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.

दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी, स्थानिक पोलीस व मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागातील अधिकारी याचा पुढील तपास करीत असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मोदींच्या बुलडोझरच्या वक्तव्याला इंडिया आघाडीचा आक्षेप; निवडणूक आयोगाने मोदींवर कारवाई करावी - खर्गे

क्रॉफर्ड मार्केटने टाकली कात, लवकरच मुंबईकरांच्या सेवेत

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार