मुंबई

गोरेगाव पश्चिम येथील २७ मजली टॉवरमध्ये आग; फायर फायटिंग सिस्टम ठप्प; नोटीस बजावणार, कायदेशीर कारवाई करणार

Swapnil S

मुंबई : गोरेगाव पश्चिम गोविंदजी श्राफ मार्ग महेश नगर येथील तळ अधिक २७ मजली अनमोल प्राईड टॉवरमध्ये बुधवारी सायंकाळी ६.११ मिनिटांनी आग लागली. टॉवरमधील २५ व २६ मजल्यावरील एका बंद रुममध्ये आग लागली असून, काही वेळात आग पसरली आणि ६.२७ मिनिटांनी लेवल दोनची आग अग्निशमन दलाकडून घोषित करण्यात आली. दरम्यान, टॉवरमधील फायर फायटिंग सिस्टम बंद असल्याने इमारतीला नोटीस बजावण्यात येणार असून, कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अग्निशमन दलाचे प्रमुख रवींद्र आंबुलगेकर यांनी सांगितले.

गोरेगाव गोविंदजी श्रॉफ मार्ग, महेश नगर येथील तळ अधिक २७ मजल्यांच्या अनमोल प्राईड इमारतीत बुधवारी सायंकाळी ६.११ वाजता आग लागल्याने परिसरात धावपळ उडाली. परंतु टॉवरमधील रहिवाशांनी खाली धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. हायराईज इमारत असल्याने अग्निशमन दलाची यंत्रणा पोहचण्यात अडचणी निर्माण झाल्या.

अस्वामी इंडस्ट्रीयल कॉम्पलेक्समध्ये आग

अनमोल प्राईड टॉवरमध्ये आगीची घटना ताजी असतानाच गोरेगाव पश्चिम राम मंदिर येथील अस्वामी इंडस्ट्रीयल कॉम्पलेक्समध्ये बुधवारी सायंकाळी आग लागली. या दुर्घटनेत रात्री उशिरापर्यंत कोणी जखमी झाले नसून, आगीवर रात्री उशिरा नियंत्रण मिळवण्यात आल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले. दरम्यान, या दुर्घटनेमुळे मृणाल ताई गोरे पूल वाहतुकीसाठी काही वेळ बंद करण्यात आला होता.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक

महिंद्राच्या 'या' नवीन SUV ची जबरदस्त क्रेझ! अवघ्या 1 तासात 50,000 हून अधिक गाड्यांचे बुकिंग! पाहा फीचर्स अन् किंमत

ठाकरे गटाचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ‘एनडीए’ला बहुमत मिळणार; देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

धक्कादायक! दहा वर्षाच्या चिमुकल्याचा गळा चिरून मृतदेह खाडीत फेकला, हत्येप्रकरणी वडिलांच्या मित्राला अटक

वांद्रे ते मरीन ड्राईव्ह फक्त १२ मिनिटांत! २.५ हजार मेट्रिक टन वजनाचा गर्डर लाँच