मुंबई

पार्किंगमध्ये आग; २९ दुचाकी वाहनांना झळ

बोरिवली पश्चिम एस. व्ही. रोड येथील वाहन पार्किंगमध्ये शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आग लागली.

Swapnil S

मुंबई : बोरिवली पश्चिम एस. व्ही. रोड येथील वाहन पार्किंगमध्ये शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या घटनेत २९ दुचाकी वाहनांना झळ बसली. यापैकी ५ दुचाकी वाहन जळून खाक झाली, तर उर्वरित २४ दुचाकी वाहने थोड्याफार प्रमाणात जळाली. दरम्यान, या घटनेत कोणीही जखमी झाले नसून, पाच मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले. बोरिवली पश्चिम एस. व्ही. रोड येथील मॉकसा मॉल जवळ असलेल्या वाहन पार्किंगमध्ये शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेत २९ दुचाकी वाहनांना झळ बसली. यापैकी ५ दुचाकी वाहने जळून खाक झाली. दरम्यान, स्थानिक पोलीस, स्थानिक वॉर्डचे अधिकारी व अग्निशमन दलाचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.

आजचे राशिभविष्य, १७ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Nag Panchami Wishes In Marathi: नागपंचमीनिमित्त प्रियजनांना पाठवा खास मराठी शुभेच्छा संदेश आणि सुंदर HD Cards

हा तर सरकार उलथवण्याचा कट!

स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी रोजच्या आयुष्यात करा 'हे' छोटे बदल

बदाम, व्हाइट चॉकलेट अन् केशरचा भन्नाट संगम! घरच्या घरी बनवा खास क्रीमी डेझर्ट