दिवाळीपूर्वी HC मोठा निर्णय! रस्त्यांवर, गल्लीबोळात फटाके फोडण्यास ‘बंदी’चा आदेश आता वर्षभरासाठी; सर्व उत्सवांत नियम लागू 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

दिवाळीपूर्वी HC मोठा निर्णय! रस्त्यांवर, गल्लीबोळात फटाके फोडण्यास ‘बंदी’चा आदेश आता वर्षभरासाठी; सर्व उत्सवांत नियम लागू

आदेशाची अमलबजावणी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वृत्तपत्रे व सोशल मीडियावर संयुक्त सूचना प्रसिद्ध कराव्यात. तसेच एका आठवड्याच्या आत शाळांमधील...

Swapnil S

​मुंबई : नवरात्रोत्सव आणि दिवाळी तसेच ख्रिसमससह सर्वच सण-उत्सवांच्या काळात सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके फोडण्यावर आता वर्षातील सर्व ३६५ दिवस बंदी लागू राहील, असा महत्त्वपूर्ण निर्णय हायकोर्टाने दिला. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण आदेश देताना यापूर्वी गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास घातलेल्या ‘बंदी’चा आदेश आता वर्षभरासाठी आणि सर्वच उत्सवांसाठी लागू राहील, असे स्पष्ट केले.

सण आणि उत्सवांच्या काळात मोठ्या आवाजातील ध्वनीप्रक्षेपक (साऊंड सिस्टीम), ॲम्प्लिफायर्स आणि फटाक्यांमुळे होणाऱ्या वायू व ध्वनी प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाने स्वतःहून (सुओमोटो ) दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

​यावेळी खंडपीठाने तीव्र चिंता व्यक्त केली. फटाक्यांच्या विषारी प्रदूषणाचा मोठा फटका ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना बसत आहे. दिवाळीनंतर परिस्थिती अतिशय कठीण होते आणि ही स्थिती बदलणे गरजेचे असून राज्य सरकार व संबंधित प्राधिकरणांचे फटाके फोडण्यावर नियंत्रण राहिलेले नाही; तसेच सर्वजण संविधानाने बांधील असून नागरिकांचे अधिकार सर्वात महत्त्वाचे असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.

व्यापक जनजागृती करण्याची सूचना

​या आदेशाची अमलबजावणी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वृत्तपत्रे व सोशल मीडियावर संयुक्त सूचना प्रसिद्ध कराव्यात. तसेच एका आठवड्याच्या आत शाळांमधील उपक्रम, सार्वजनिक घोषणा आणि बस-ट्रेनमधील माहिती फलकांद्वारे जनजागृती यंत्रणा उभारण्याचे, निर्देशही खंडपीठाने दिले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मसाल्यात भेसळ केल्यास ७ वर्षे शिक्षा, १० लाख दंड; FDA ची नवी नियमावली जारी

रायगड जिल्ह्यात भात पीक संकटात; लागवडीचे क्षेत्र घटले, दरवाढीची चिन्हे

दिवाळीत एसटी प्रवाशांना दिलासा; १५ टक्के हंगामी भाडेवाढ रद्द

CJP Protest : झुरळे आज पुन्हा रस्त्यावर; मार्च रोखण्यास न्यायालयाचा नकार, तर पालिकेचा खोडा

१ नोव्हेंबरपासून फोन करणाऱ्याचे नाव दिसणार; दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय