मुंबई

सांताक्रुझमध्ये अग्निभडका; ३७ जणांना वाचवले; मोठा अनर्थ टळला

Swapnil S

मुंबई : सांताक्रुझ पश्चिम मिलन सबवे येथील तळ अधिक दोन मजली ऑप्शन कमर्शियल इमारतीत सोमवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. काही वेळात आग वाऱ्यासारखी पसरली. यावेळी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर तसेच टेरेसवर अडकलेल्या ३७ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू केल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, १० ते १५ मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख रवींद्र आंबुलगेकर यांनी सांगितले. दरम्यान, सांताक्रुझ येथील ऑप्शन या कमर्शियल इमारतीत लागलेल्या आगीत खुशी धाडवे (१९) यांना धुराचा त्रास झाल्याने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांनी स्वतःहून डिस्चार्ज घेतला.

मिलन सबवे येथील तळ अधिक दोन मजली ऑप्शन कमर्शियल इमारतीत सोमवारी सायंकाळी आग लागली. काही वेळात आग इमारतीत पसरली आणि इमारतीतील गाळेधारकांनी दुसऱ्या मजल्यावर तसेच टेरेसवर धाव घेतली. मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. यावेळी दुसऱ्या मजल्यावर व टेरेसवर अडकलेल्या ३७ गाळेधारकांची इमारतीतील पायऱ्यांवरून खाली आणत सुखरूप सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण समजू शकलेले नाही. परंतु स्थानिक पोलीस, स्थानिक पालिकेचे अधिकारी व अग्निशमन दलाचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस