मुंबई

पालिका रुग्णालयात प्रथमच बायोमिथेनेशन प्लांट

Swapnil S

मुंबई : पालिका रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करत बायोगॅसची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी केईएम, सायन, नायर, राजावाडी व क्षयरोग रुग्णालयात पहिलाच बायोमिथेनेशन प्लांट उभारण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल ९ कोटी रुपये खर्च करणार असून गॅसचा वापर उपहारगृहात करण्यात येणार आहे.

कचरामुक्त मुंबईसाठी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. पालिकेच्या सर्वच रुग्णालयांमध्ये कॅन्टीन असून रुग्णालय परिसरात कर्मचारी, डॉक्टर, परिचारिकांच्या वसाहती आहेत. या ठिकाणी टाकाऊ अन्नपदार्थ, भाजीपाला व अन्य दररोज हजारो किलो ओला कचरा निर्माण होतो. हा कचरा थेट डम्पिंग ग्राऊंडवर जातो. या कचऱ्यावर रुग्णालयांच्या आवारातच प्रक्रिया करून त्यापासून बायोगॅस निर्माण करण्यात येणार आहे. प्रत्येक रुग्णालयात दोन मेट्रिक टन क्षमतेचा प्लांट उभारला जाणार आहे.

पालिकेने या प्रकल्पासाठी राबविलेल्या निविदा प्रक्रियेत एकूण चार कंत्राटदारांनी भाग घेतला होता. त्यापैकी एअरोकेअर एव्हिएशन सर्व्हिसेस या कंत्राटदाराला ९ कोटी १२ लाख रुपयांत हे काम देण्यात आले आहे.

वीज व पैशांची बचत!

रुग्णालयात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करत बायोगॅसची निर्मिती केली जाणार आहे. विशेष म्हणजे बायोगॅसचा वापर रुग्णालयातील उपहारगृहात केला जाणार आहे. यामुळे कचरा संकलन आणि प्रक्रियेचे विकेंद्रीकरण होईल, तसेच कचरा वाहतुकीचा खर्च व स्वयंपाकासाठी लागणारा खर्चही कमी होईल. रुग्णालयातील ओला कचरा कमी पडल्यास संबंधित वॉर्ड, विभागातील हॉटेल व अन्य ठिकाणांहून मिळवला जाईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

उपहारगृहातील कचऱ्यावर प्रक्रिया

उपहारगृहात गॅसचा वापर

केईएम, सायन, नायर, राजावाडी रुग्णालयात प्रकल्प

पालिका ९ कोटी रुपये खर्च करणार

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त