मुंबई

रेल्वेत नोकरी देण्याच्या आमिषाने पाच बेरोजगारांची फसवणूक

भारतीय रेल्वेत नोकरी मिळत असल्याने त्यांनी त्यास होकार दिला होता. त्यानंतर त्यांनी त्याला नोकरीसाठी सव्वातीन लाख रुपये दिले होते.

नवशक्ती Web Desk

मुंबई : रेल्वेत ट्रकमन व गॅगमन पदावर नोकरी देण्याच्या आमिषाने पाच बेरोजगार तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी राकेश बापू जाधव या भामट्याविरुद्ध बोरिवली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. फसवणूक झालेले पाचही तरुण नाशिकचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सागितले. ३४ वर्षांचे तक्रारदार शेतकरी असून, ते मूळचे नाशिकचे रहिवाशी आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांचा भाऊ व इतर नातेवाईक बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात न्यायालयीन सुनावणीसाठी आले होते. तिथेच त्यांची राकेश जाधवशी ओळख झाली होती. त्याने त्यांना तो कस्टममध्ये कामाला असून, त्याची रेल्वेमध्ये ओळख असल्याचे सांगितले होते. यावेळी त्यांनी रेल्वेची परिक्षा दिली होती, मात्र त्यांची निवड झाली नसल्याचे त्याला सांगितले होते. यावेळी त्याने त्यांच्या भावासह इतर चार नातेवाईकांना रेल्वेमध्ये ट्रकमन आणि गॅगमन पदावर नोकरी देण्याचे आश्‍वासन दिले होते. या कामासाठी त्याने त्यांच्याकडे सात लाखांची मागणी केली होती. भारतीय रेल्वेत नोकरी मिळत असल्याने त्यांनी त्यास होकार दिला होता. त्यानंतर त्यांनी त्याला नोकरीसाठी सव्वातीन लाख रुपये दिले होते.

मुंबईकरांनो, पाण्याचा गैरवापर केला तर कारवाई! २०२७ पर्यंतच्या पाणी नियोजनाचे आव्हान, १० टक्के पाणीकपात कायम

Mumbai : महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण; १४ हजार लुटले, तिघा सराईत गुन्हेगारांना अटक

सर्वोच्च न्यायालयावर दबावाचा प्रयत्न - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Mumbai : कोस्टल रोडच्या भरावात अनधिकृत मातीचा वापर; कंत्राटदाराला पालिकेची नोटीस

रॉबर्ट हॉल, मायकेल वूडफर्ड यांना अर्थशास्त्राचे नोबेल