BMC अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर Photo Credit: Prashant Narvekar
मुंबई

महालक्ष्मीतील उड्डाणपूल ऑक्टोबर २०२६ पर्यंत खुला करावा; पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ डॉ. ई. मोझेस मार्गावर उड्डाणपूल आणि केशवराव खाड्ये मार्गावर केबल आधारित उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ डॉ. ई. मोझेस मार्गावर उड्डाणपूल आणि केशवराव खाड्ये मार्गावर केबल आधारित उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. हे पूल बांधकाम जलदगतीने पूर्ण करावे, पावसाळ्याच्या कालावधीत कामे खोळंबणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यासाठी आतापासून नियोजन करावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त बांगर यांनी संबंधितांना दिले.

महालक्ष्मी येथे होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी विकास नियोजन आराखड्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दोन नवीन पूल बांधण्यात येत आहेत. या पुलांमुळे वाहतुकीचे नियमन सुरळीत होणार आहे. केशवराव खाड्ये मार्गावर महालक्ष्मी येथे उभारण्यात येणारा 'केबल स्टेड पूल' हा रेल्वे रुळांवरील महानगरपालिकेचा पहिला केबल आधारित पूल आहे. महालक्ष्मी रेल्वे स्थानकानजीक पश्चिम रेल्वेवरून सात रस्ता ते महालक्ष्मी मैदान यांना हा पूल जोडतो. या पुलाची लांबी ८०३ मीटर, तर रुंदी १७.२ मीटर आहे.

मोठा पूल बांधण्यासाठी ७ महिन्यांचा कालावधी

केबल स्टेड पुलास आधार देण्यासाठी ७८ मीटर उंच पायलॉन (मोठा खांब) उभारावा लागणार आहे. त्यासाठी अंदाजे २०० दिवस (म्हणजेच ७ महिन्यांचा) कालावधी अपेक्षित आहे. त्याचबरोबर केबल स्टेड पुलाच्या दोन्ही बाजूंचे काम एकत्रितपणे करावे लागणार आहे. रेल्वे हद्दीत रेल्वे प्रशासनाच्या परवानगीने टप्प्याटप्प्याने कार्यवाही केली जाणार आहे.

केबल पुलाच्या स्पॅन बांधकामासाठी २५० दिवसांचा कालावधी

केबल पुलाच्या स्पॅन बांधकामासाठी सुमारे २५० दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. याचा विचार करता बांधकामासह पुलाची अनुषंगिक कामे दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण व्हायला हवी. यासाठी कामांचे वेळापत्रक निश्चित केले पाहिजे. हे करत असताना शक्य असेल तेव्हा एकाचवेळी दोन कामे एकत्रित (ओव्हर लॅपिंग) करावीत, जेणेकरून वेळेची बचत होईल. पावसाळ्यात कामे थांबणार नाहीत, अशा दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश बांगर यांनी दिले.

'चुकून व्हिडिओ हटवला'; पंतप्रधान मोदींच्या फेसबुक पोस्टप्रकरणी Meta ची माफी

ठाण्यात भाजपला डावलल्याचा आरोप; 'सात प्रकल्पांचे पुन्हा उद्घाटन करा', आयुक्तांना पत्र

लातूरमध्ये माथेफिरू प्रवाशाने ओढले स्टेअरिंग; एसटी दोन स्कूलबसना धडकली, ५ जण जखमी, Video

कोल्हापूर-सांगलीचा पूर रोखणार; ३२०० कोटींची योजना; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

Bhayandar : लग्नाच्या रिसेप्शनला न गेल्यावरून पती-पत्नीमध्ये वाद; आईला वाचवण्यासाठी मध्ये पडलेला मुलगा चाकूचा वार लागून ठार