मुंबई

विमानतळावर विसराळूपणा वाढला;४९ हजार वस्तू विसरले, ८२०१ वस्तू परत केल्या

Swapnil S

मेघा कुचिक/मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांचा विसराळूपणा वाढत चालल्याचे त्यांनी विसरलेल्या वस्तूतून दिसून येत आहे. जानेवारी २०२३ ते नोव्हेंबर २०२३ दरम्यान ४९४८५ वस्तू विमानतळावर हरवल्या. त्यापैकी केवळ ८२०१ वस्तू प्रवाशांना परत देण्यात आल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ‘हरवले व सापडले’ विभागात ४९४८५ वस्तू हरवल्याची नोंद झाली. या वस्तूंमध्ये दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू आहेत, तर ८२०१ वस्तू प्रवाशांना परत दिल्या आहेत, तर ४१२८४ वस्तूंवर अजूनही कोणी दावा केला नाही. ‘हरवले व सापडले’ विभागाने या वस्तू अजूनही जपून ठेवलेल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ‘हरवले व सापडले’ विभागात ईअरफोन, चार्जर, चष्मा, जॅकेट, बेल्ट आदी वस्तू मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत.

प्रवाशांना त्यांचे सामान मागे ठेवण्यापासून रोखण्यासाठी ‘हरवले व सापडले’ विभागातील टीमने प्रवाशांच्या बॅग, पाकीट, आधार कार्ड आणि मोबाईल फोन यांसारख्या वस्तूंवरील संपर्क तपशील ओळखून त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. या वस्तूंच्या मालकाची ओळख पटल्यावर त्यांना त्या तात्काळ परत केल्या जातात. संबंधित प्रवाशाची ९० दिवस वाट पाहिली जाते. त्यानंतर त्या वस्तू कस्टम विभागाकडे पाठवल्या जातात. वस्तूंची सुरक्षितता लक्षात घेऊन इलेक्ट्रॉनिक्स वस्तू या लॉकर्समध्ये ठेवल्या जातात, तर बॅग व अन्य वस्तूंवर योग्य पद्धतीने लेबल लावले जाते. ते खराब होऊ नयेत म्हणून काळजी घेतली जाते.

‘हरवले व सापडले’ या विभागात खास कर्मचारी वर्ग नियुक्त केलेला आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी तो काळजी घेत असतो. प्रवाशांना गरज लागल्यास ते ९९३०१४४२७२, ९६१९०५०५८०, ८८७९९९२३७१ या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात.

निवडणुकीनंतरही संघर्षमय राजकारण

ऑनलाईन गेमची उलाढाल

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक

महिंद्राच्या 'या' नवीन SUV ची जबरदस्त क्रेझ! अवघ्या 1 तासात 50,000 हून अधिक गाड्यांचे बुकिंग! पाहा फीचर्स अन् किंमत

ठाकरे गटाचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ‘एनडीए’ला बहुमत मिळणार; देवेंद्र फडणवीस यांना विश्वास