मुंबई

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राणी बागेतील महापौर निवासस्थान रिकामे करायला केली सुरुवात

प्रतिनिधी

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राणी बागेतील महापौर निवासस्थान रिकामे करायला सुरुवात केली आहे. १० मेपर्यंत किशोरी पेडणेकर या लोअर परळ, सनमिल कंपाउंड येथील घरात शिफ्ट होणार आहेत.

महापौर, उपमहापौरांसहित नगरसेवकांचा कार्यकाळ ७ मार्च रोजी संपुष्टात आल्याने ८ मार्चपासून मुंबई महापालिकेत प्रशासकीय राज्य आले आहे. नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर नियमानुसार गाडी, बंगला पालिका प्रशासनाच्या स्वाधीन करणे बंधनकारक आहे. अखेर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राणी बागेतील निवासस्थान खाली करण्यास सुरुवात केली असून मंगळवारपर्यंत त्या लोअर परळ येथील घरात शिफ्ट होणार आहेत.

दरम्यान, महापौरपदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही काही कारणास्तव त्यांनी महापौर बंगला वापरू देण्याची विंनती मुंबई महापालिकेचे आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बाल सिंग चहल यांना केली होती. ती त्यांनी मान्य केल्याने किशोरी पेडणेकर या आजपर्यंत राणी बागेतील बंगल्यात वास्तव्य करू शकल्या. मात्र महापौरपद गेल्यानंतरही त्या आजही काळजीवाहू माजी महापौर म्हणून व मुंबईचे दायित्व स्वीकारून काम करीत आहेत. परंतु आता राणी बागेतील बंगला त्यांनी खाली करण्याचा निर्णय घेतला आहे. लोअर परळ, सनमिल कंपाउंडमधील इमारतीतील जुन्या ५५० चौ. फुटाच्या घरात सामान शिफ्ट करायला सुरुवात केली आहे. येत्या १० मेपर्यंत सदर बंगल्यातील सर्व सामान त्या आपल्या जुन्या घरी शिफ्ट करून पुढे त्याच घरात राहायला जाणार आहेत.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस