मुंबई

शहरात तीन अपघातांच्या घटनांमध्ये पती-पत्नीसह चौघांचा मृत्यू

Swapnil S

मुंबई : विक्रोळी, गोरेगाव व दहिसर येथे गुरुवारी दिवसभरात तीन अपघाताच्या घटना घडल्या असून, या अपघातात एका पती-पत्नीसह महिला आणि १९ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये शिवहरी बंगेरा, त्यांची पत्नी शोभा शिवहरी बंगेरा, शारदाबाई बबन वालेकर ऊर्फ अलिमाबी शेख आणि जुनैद युसूफ भाटकर यांचा समावेश आहे. याप्रकरणी आरे, दहिसर आणि विक्रोळी पोलिसांनी तीन स्वतंत्र अपघाताची नोंद केली आहे.

सर्फराज शहानवाज खान हा घाटकोपर येथे राहत असून, त्याचा नाजमीन या महिलेसोबत विवाह झाला होता. तिला पहिल्या पतीपासून मृत जुनैद, निदा आणि उदा असे तीन मुले आहेत. लग्नानंतर ते तिघेही गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्यासोबत राहत आहे. बुधवारी जुनैद हा त्यांच्या कपड्याच्या दुकानात आला होता. गुरुवारी रात्री साडेतीन वाजता पंतनगर ब्रिजजवळ जुनैदला अपघात झाला होता. त्यामुळे त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तपासात एका ट्रक धडक लागून जुनैदचा अपघात झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.

दुसरा अपघात गुरुवारी २१ डिसेंबरला सकाळी साडेनऊ वाजता गोरेगाव येथील आरे कॉलनी, युनिट २२ बसस्टॉपजवळ झाला. या अपघातात शारदाबाई ऊर्फ अलिमाबी या महिलेचा मृत्यू झाला. गुरुवारी ती कामावर जाताना रस्ता क्रॉस करत होती. यावेळी भरवेगात जाणार्‍या एका बाईकने तिला धडक दिली होती.  तिसऱ्या अपघातात शोभा आणि तिचे पती शिवहरी बंगेरा यांचा मृत्यू झाला. गुरुवारी २१ डिसेंबरला दुपारी साडेबारा वाजता रोहन शिवहरी बंगेरा हा त्याचे आई-वडिल शोभा व शिवहरी बंगेरा यांच्यासोबत त्यांच्या अल्टो कारमधून दहिसर पूर्वेला जात होते. ही कार दहिसर येथील लिंक रोडवरील आनंदनगर ब्रिजवर येताच समोरुन येणाऱ्या निता ट्रॅव्हेल्स बसने कोणतेही सिग्नल न देता अचानक लेन बदलण्याचा प्रयत्न केला. त्यात बसची कारला जोरात धडक लागून कारमधील तिघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. जखमी तिघांनाही शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे शोभा आणि शिवहरी यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर रोहनवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.

पुण्यासह सांगली,मिरज,कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

सूनेनं केली सासऱ्याच्या घरात चोरी, मामेभावासोबत केलं परफेक्ट प्लॅनिंग, तीन लाखांची रोकड चोरली

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

कार देणार बाईकएवढं मायलेज! 'ही' CNG कार लवकरच होतीये लॉन्च, किती असेल किंमत?