मुंबई

जे.जे रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी कामबंंद आंदोलन करणार

प्रतिनिधी

राज्यातील आरोग्य क्षेत्रातील कंत्राटीकरण नियुक्त्यांवर परिचारिकांनी केलला बेमुदत संप संपला असतानाच, आता चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. कंत्राटीऐवजी कायमस्वरुपी चतुर्थ श्रेणीतील कर्मचा-यांच्या नियुक्त्या करा या मुख्य मागणी साठी जे.जे रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी सोमवारी (दि ६) ते बुधवार (दि.८) सकाळी ८ ते १० या वेळेत कामबंंद आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाची झळ लवकरच राज्यभरात दिसून येईल,असा इशाराही यावेळी दिला गेला.

कोरोना काळात जीवावर उदार होऊन डॉक्टर, नर्स आणि चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांनी काम केले. त्यावेळी कुटुंबाचा विचार देखील न करता आणि तहान भूक विसरून रुग्णसेवा केली. देशभरात कोविड योद्धे म्हणून या सर्वांना गौरविण्यात आले. मात्र त्यानंतर आम्ही केलेल्या कामाचा सरकारला विसर पडलेला दिसतो, असे चतुर्थश्रेणी राज्य सरकारी कर्मचारी संंघटनचे अध्यक्ष काशिनाथ राणे सांगतात.

सध्या जेजे रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या १६० जागा रिक्त आहेत. आणि १३ एप्रिल रोजी सरकारी अध्यादेशातून राज्य शासनाच्या रुग्णालयातील जागेवर कंत्राटी पद्धतीने चतुर्थ श्रेणीतील नियुक्त्या केल्या जातील, असे जाहीर करण्यात आले. त्यामुळे सरकारी रुग्णालयातील चतुर्थ श्रेणीतील रिक्त पदे भरण्यासाठीही कंत्राटी पद्धतीचा अवबंल केला जाईल. कंत्राटीपद्धतीने नोकरीचे भवितव्य अंधारात येईल, असे राणे सांगतात.

लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक; योजनेसाठी पारदर्शकतेला प्राधान्य देणार - अदिती तटकरे

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; ४०० हून अधिक चित्रपटांत उमटवला अभिनयाचा ठसा!

Latur : लातूरमध्ये पावसाचा कहर; ४० तासांनंतर सापडले ५ जणांचे मृतदेह

पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरची गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मनसेचा आज ट्रॅफिक मार्च; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन