मुंबई

रूमचा ताबा न देता, हेवी डिपॉझिटवर रूम देऊन फसवणूक; पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा

Swapnil S

मुंबई : खरेदी-विक्रीनंतर संपूर्ण पेमेंट करूनही रूमचा ताबा न देता हेव्ही डिपॉझिटवर रूम देऊन फसवणूक केल्याप्रकरणी एका पिता-पुत्राविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पप्पू हिरालाल गुप्ता आणि सुमित पप्पू गुप्ता अशी या दोघांची नावे आहेत. एका खासगी कंपनीत काम करणारे तक्रारदार अंधेरी परिसरात राहतात. त्यांना अंधेरी येथे स्वतचे घर घ्यायचे होते. एका एजंटने त्यांची ओळख गुप्ता पिता-पुत्राशी करून दिली होती. त्यांचा अंधेरीतील रामनाथ यादव चाळीतील पंचशील रहिवाशी संघात एक घर होते. त्यांना या रूमची विक्री करायची होती. चर्चेनंतर त्यांच्यात २१ लाखांमध्ये रूम विक्रीचा सौदा झाला होता. त्यामुळे त्यांनी गुप्ता पिता-पुत्राला टप्प्याटप्प्याने २१ लाख रुपये दिले होते. यावेळी त्यांच्यात कायदेशीर करार झाला होता; मात्र संपूर्ण पेमेंट करूनही त्यांनी रुमचा ताबा दिला नव्हता. थोडा वेळ मागून ते दोघेही त्यांना ताबा देण्यास टाळण्याचा प्रयत्न करत होते. एक आठवड्यानंतर ते घराचा ताबा घेण्यासाठी तिथे गेले होते. यावेळी त्यांना त्यांच्या घरामध्ये भाडेकरू राहत असल्याचे दिसून आले. चौकशीदरम्यान त्यांना यादव पिता-पुत्राने त्यांची खरेदी केलेले घर गिरीश रावत या व्यक्तीला पाच लाख रुपयांच्या हेवी डिपॉझिटवर भाड्याने दिले होते.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस