मुंबई

एक कोटीच्या गुंतवणुकीवर दीड कोटी देण्याच्या आमिषाने फसवणूक

फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

नवशक्ती Web Desk

मुंबई : एक कोटीच्या गुंतवणुकीवर दिड कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवून गोरेगाव येथील एका व्यावसायिकाची अज्ञात भामट्यांनी फसवणूक केल्याचा प्रकार काळबादेवी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका अंगाडियासह दोघांविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. यातील तक्रारदार व्यावसायिक असून, त्यांचा मसाला विक्रीचा होलसेल व्यवसाय आहे. अनेकदा ते दक्षिण मुंबईत कामानिमित्त येत होते. याच दरम्यान त्यांची विकी नावाच्या एका तरुणाशी ओळख झाली होती. तो दिल्लीतील एका एनजीओसाठी काम करत असून, या एनजीओमध्ये रोख स्वरुपात गुंतवणूक केल्यास त्यांना पन्नास टक्के कमिशनचे आमिष दाखविले होते. किमान एक कोटीची गुंतवणूक करा, काही वेळात त्यांच्या खात्यात दिड कोटी रुपये जमा होतील, असे सांगितले. त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्याने त्याला एका अंगाडियाच्या समक्ष एक कोटी रुपये दिले होते. त्यानंतर त्यांना त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल, असे सांगण्यात आले; मात्र त्यांनी ती रक्कम ट्रान्स्फर केली नव्हती. त्यामुळे त्यांनी विकीसह संबंधित अंगाडियाला संपर्क साधला होता, मात्र या दोघांचे फोन बंद होते. अंगाडियाच्या कार्यालयात कुलूप लावलेले होते. फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

मोठी बातमी! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; दुबार मतदान रोखण्यासाठीही आणलं खास 'टूल'

सातारा जिल्ह्यातील 'राधा' म्हशीचा जगात डंका; सर्वात बुटकी म्हैस म्हणून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद

ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला गती; देशातील सर्वात लांब शहरी बोगदा

कोइंबतूर विमानतळाजवळ गँगरेप प्रकरण; पोलिसांवर हल्ला करून पळण्याचा प्रयत्न करणारे तिघे अटकेत

डॉ. संपदा मुंडे मृत्यू प्रकरण : बेटी पढ़ी, पर बची नहीं... डॉक्टरांचे काम बंद आंदोलन; अधिकाऱ्यांचाही इशारा