मुंबई

गणेशोत्सवात ध्वनिक्षेपकासाठी आणखी एक दिवस वाढवा; बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक समितीची मागणी

यंदा गणेशोत्सवात एकूण चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक लावण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. या चार दिवसांमध्ये अर्थात दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि अनंत चतुर्दशी या दिवसांचा समावेश आहे.

Swapnil S

मुंबई : यंदा गणेशोत्सवात एकूण चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक लावण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. या चार दिवसांमध्ये अर्थात दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि अनंत चतुर्दशी या दिवसांचा समावेश आहे. तर या दिवसांमध्ये अधिक एक दिवस वाढवून द्यावा, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक समितीने राज्य सरकारकडे केली आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनिप्रदूषण नियम २००० अंतर्गत केंद्र शासनाने प्रत्येक राज्याला १५ दिवसांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक लावण्याची परवानगी दिली आहे. परवानगीमध्ये ध्वनीची मर्यादा दिवसा ५५ डेसीबल व रात्री ४५ डेसीबलपर्यंत मर्यादित आहे. सन २०१३ पर्यंत समितीच्या मागणीनुसार गणेशोत्सव काळात ४ दिवस रात्री १२ पर्यंत परवानगी मिळत होती. ही परवानगी गणेश विसर्जनाच्या दिवसांपर्यंत म्हणजेच दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि अनंत चतुर्दशी या चार दिवसासाठी मर्यादित आहे. उर्वरित १५ दिवसांपैकी ९ दिवस वेगवेगळ्या धार्मिक सणासाठी ध्वनिक्षेपक वापरण्यासाठीची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात येते.

दरम्यान, यंदा गणेशोत्सवात ध्वनिक्षेपकासाठी आणखी एक दिवस वाढवून द्यावा अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक समितीने केली आहे.

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार