उरण : बुधवारी गेट वे मुंबई ते घारापुरी (एलिफंटा) येथे जाणाऱ्या प्रवासी बोटीचा अपघात झाला. यामध्ये १३ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. शोध कार्यानंतर उरण नेव्ही येथील रुग्णालयात आणलेल्या १० दहा जणांना आणि जे एनपीए रुग्णालयात आणलेल्या एका मुलाला उरणच्या इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले होते. एकूण ११ जणांचे शवविच्छेदन गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत पूर्ण करून त्यांचे शव त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याची माहिती इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी बाबासो कालेल यांनी दिली आहे.
शवविच्छेदनानंतर त्या सर्वांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आले आहे. यामध्ये १) राकेश मानाजी आहिरे (३४), २) हर्षदा राकेश आहिरे (३१), ३) निलेश राकेश आहिरे (५), ४) महेंद्रसिंग बिजनसिंग शेरवाबत (३१), ५) माही साईराम पावरा (३), ६) मंगेश महादेव केलशीकर (३३), ७) महादेव रहमान खुरेशी (३५), ८) शमारती देवी बासदेव गुप्ता (५०), ९) प्रज्ञा विनोद कांबळी (३९), १०) सकीना आशरफ पठाण (३४), ११) प्रवीण रामनाथ शर्मा (३४) यांचा समावेश आहे.
मुंबई गेटवे ते घारापुरी (एलिफंटा) येथे लेणी पाहण्यासाठी पर्यटक नीलकमल या नावाच्या लॉन्समधून जवळपास ८० ते ९० प्रवासी जात होते.