मुंबई

सिल्व्हर ओकवर गौतम अदाणींनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चांना उधाण

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी समूहाच्या जेपीसी चौकशीची गरज नसल्याचे म्हटले होते, आता या भेटींमुळे चर्चांना उधाण

नवशक्ती Web Desk

प्रसिद्ध उद्योगपती आणि अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यामध्ये तब्बल २ तास चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली असून देशाच्या राजकारणात या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या दोघांमध्ये काय चर्चा झाली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी अदाणींच्या बाजूने भूमिका मांडल्याने महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. शरद पवार यांनी गौतम अदानी यांच्या समूहाच्या जेपीसी चौकशीची गरज नसल्याचे म्हटले होते. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप विरोधात विरोधी पक्ष एकजूट होत असताना शरद पवारांची उद्योगपती गौतम अदाणींसोबत तब्बल २ तास चर्चा झाल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

दिल्लीतील विवेक विहारमधील चार मजली इमारतीला भीषण आग; ९ जणांचा होरपळून मृत्यू

Mumbai : आता उद्यानांमध्ये मातांसाठी स्तनपान कक्ष; आराखडा तयार, विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत समावेश करणार

मुंबईतील तीन महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के; सात महाविद्यालयांमधील काही शाखांचा निकाल शून्य टक्के

Mumbai : पालिकेचे स्टॉल्स भाऊ-बहिणीच्या नावे नाहीच

मुंबई विभागाचा निकाल घसरला; यंदाचा सर्व शाखांचा निकाल ९०.०८ टक्के, गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात २.८५ टक्के घट