मुंबई

दादरला उतरा आता दोन्ही बाजूला; प्लॅटफॉर्म नंबर १० वरील लोकल, मेल-एक्स्प्रेसच्या प्रवाशांना दिलासा

दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर १० वरील लोकल आणि मेल-एक्स्प्रेसमधील प्रवाशांना मध्य रेल्वे प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना दोन्ही बाजूने लोकल, मेल-एक्स्प्रेसमध्ये चढता-उतरता येत असल्याने प्रवाशांचा प्रवास सुखकर होऊ लागला आहे.

Swapnil S

मुंबई : दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर १० वरील लोकल आणि मेल-एक्स्प्रेसमधील प्रवाशांना मध्य रेल्वे प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना दोन्ही बाजूने लोकल, मेल-एक्स्प्रेसमध्ये चढता-उतरता येत असल्याने प्रवाशांचा प्रवास सुखकर होऊ लागला आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील विविध रेल्वे स्थानकांच्या मेक ओव्हरचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. अमृत भारत योजनेंतर्गत अमृत स्टेशन म्हणून स्टेशनचा कायापालट करण्यात येत आहे. दादर रेल्वे स्थानक हे अत्यंत गर्दीचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. जलद लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांना येथे थांबा असल्याने या स्थानकात प्रचंड वर्दळ असते. स्थानकातील गर्दीवर उपाय मध्य रेल्वे प्रशासनाने शोधला आहे. त्यानुसार, सुरुवातीला प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरील गर्दीला कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म वाढविण्यात आला. त्यामुळे प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी झाली आहे. मात्र त्यामुळे येथील होम प्लॅटफॉर्म बंद झाला. परिणामी येथून सुटणाऱ्या गाड्या आता परळ रेल्वे स्थानकातून सोडण्यात येत आहेत. दादर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरील लोकल प्रवाशांना दोन्ही बाजूंना उतरता आणि चढता यावे म्हणून पश्चिमेकडील भागावर नवा प्लॅटफॉर्म बांधावा, यासाठी रेल्वे प्रवासी संघटना आग्रही होत्या.

यापूर्वी प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना केवळ प्लॅटफॉर्म नंबर १० वरूनच लोकल, मेल-एक्स्प्रेस पकडता येत होती. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या गर्दीने लोकल प्रवाशांना त्रास होत होता. प्लॅटफॉर्म १० वर फास्ट लोकल येत असून, या प्लॅटफॉर्मवर मेल-एक्स्प्रेसलाही थांबा आहे. प्लॅटफॉर्म १० च्या विरुद्ध बाजूस सुरुवातीला लोखंडी कुंपण होते. त्यामुळे प्रवाशांना केवळ एकाचा बाजूला उतरता येत होते. हे कुंपण काढून त्या जागी नवा प्लॅटफॉर्म बांधण्यात आला आहे. प्लॅटफॉर्मवरील कामे अपुर्ण असली तरी तुर्तास झालेल्या कामामुळे प्रवाशांना चढण्या-उतरण्याच्या दोन्ही बाजू मोकळ्या झाल्या आहेत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात