मुंबई

विमानातून उतरा आणि बसमध्ये बसा!

प्रतिनिधी

देशविदेशातून येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमाने विमानतळाच्या प्रवेशद्वारापासून बेस्ट बसची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे विमानातून उतरा, बसमध्ये बसा, अशी सोय विमान प्रवाशांसाठी उपलब्ध केली आहे.

बेस्टच्या चलो अॅपद्वारे प्रवासी आसन आरक्षणा बरोबरच प्रवास भाड्याची रक्कम देखील अदा करू शकणार आहेत. या एअरपोर्ट सेवेच्या बसगाड्यांवरील कार्यरत बसचालकांना प्रवासी कोणत्या बसथांब्यावर बसगाडीच्या प्रतीक्षेत आहे, याची माहिती अॅपद्वारे मिळणार आहे. त्यानंतर बसचालक संबंधित बसथांब्यावर बसगाडी थांबवून प्रवासी बसगाडीत घेऊ शकतात. तसेच प्रवाशांना त्यांच्या मोबाइल अॅपद्वारे आसन आरक्षित केलेल्या बसगाडीचे ठिकाण स्वतःच्या मोबाइलवरही पाहता येणार आहे. एअरपोर्ट सेवेची बसगाडी कोणत्या बसथांब्यावर उपलब्ध होणार आहे. हे प्रवाशांना समजण्याकरिता बेस्ट उपक्रमातर्फे विशिष्ट पध्दतीचे ‘स्टिकर्स’ संबंधित बसथांब्यांवर प्रदर्शित केले आहेत.

विमान प्रवाशांव्यतिरिक्त इतर कोणतेही प्रवासी या बसमार्गांवरील कोणत्याही एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत अगाऊ तिकीटाचे आरक्षण करून प्रवास करु शकतात. या बस सेवेकरता अॅपद्वारे बसचे लाइव्ह ट्रॅकिंग करता येणार आहे. तसेच या बसच्या प्रवासाकरिता सोबत असलेल्या सामानाकरिता कोणतेही भाडे आकारण्यात येणार नाही.

विमानतळ १ : ही बससेवा विमानतळ ते बॅकबे आगार दरम्यान उपलबध असून सदर बसचे दर किमान प्रवासभाडे रु.५०/- व कमाल प्रवासभाडे रु.१७५/- आहे आणि या मार्गावर एका तासाच्या अंतराने बस उपलब्ध आहेत.

विमानतळ २ : ही बससेवा विमानतळ ते जलवायू विहार खारघरपर्यंत असून या बसमार्गावर किमान प्रवासभाडे रु.५०/- व कमाल प्रवासभाडे रु.२५०/- आहे आणि बसगाड्या एका तासाच्या प्रस्थानांतराने उपलब्ध आहेत.

विमानतळ ४ : ही बससेवा छत्रपती शिवाजी महाराज आंतरदेशीय विमानतळ ते कॅडबरी जंक्शन ठाणे दरम्यान धावेल. या बसमार्गावर किमान प्रवासभाडे रु.५०/- व कमाल प्रवासभाडे रु.१५०/- आहे आणि बसगाड्या एका तासाच्या प्रस्थानांतराने उपलब्ध.

T20 World Cup साठी टीम इंडियाची घोषणा: पंत, यशस्वी, चहल, दुबेला संधी; रिंकू, गील राखीव खेळाडूंमध्ये

शिंदे गटाची खेळी; महिन्याभरापूर्वी आलेल्या रवींद्र वायकरांना उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारी

प्रवाशांना ‘बेस्ट’ दरवाढीचा झटका? साध्या बसचे किमान तिकीट ७ रुपये; AC बसचे १० रुपये होणार

किरकोळ कारणावरून प्रवाशाला लोकलमधून ढकलले, एक हात निकामी

नाशिकमधून शिंदेंची वेगळी खेळी! थेट शांतीगिरी महाराजांनाच उमेदवारी, गोडसेंना धक्का