अशी चपराक बसेल की, तुम्ही कधीच उठणार नाही! मंत्री गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरेंना इशारा 
मुंबई

अशी चपराक बसेल की, तुम्ही कधीच उठणार नाही! मंत्री गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

‘उद्धवजी, मुंबईमध्ये तुम्हाला अशी चपराक बसेल की तुम्ही पुन्हा कधीच उठणार नाहीत,’ अशा शब्दांत राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना सूचक इशारा दिला.

Swapnil S

नाशिक : ‘उद्धवजी, मुंबईमध्ये तुम्हाला अशी चपराक बसेल की तुम्ही पुन्हा कधीच उठणार नाहीत,’ अशा शब्दांत राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना सूचक इशारा दिला.

नाशिकमध्ये भाजपच्या प्रचाराचा नारळ रविवारी मोठ्या उत्साहात फोडण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘विजय संकल्प मेळावा’ पार पडला.

यावेळी मंत्री महाजन म्हणाले की, ‘गेल्या २५ वर्षांपासून मराठी मराठीचा जप करून तुम्ही मराठी माणसासाठी नेमके काय केलेत? हे आता जनतेला चांगलेच समजले आहे. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येऊन केवळ भूलथापा मारण्याचे काम सुरू आहे,’ असे ते म्हणाले.

मुंबईच नव्हे, तर राज्यातील इतर महापालिकांबाबतही मोठा दावा त्यांनी केला आहे. ते म्हणाले की, ‘राज्यातील १० प्रमुख महापालिकांमध्ये एकाही ठिकाणी विरोधी पक्षाचा महापौर बसणार नाही. १६ तारखेला जेव्हा निकाल लागेल, तेव्हा विरोधकांना आपली जागा कळलेली असेल. मनपा निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उबाठाच्या सत्तेला यंदा भाजपने सुरुंग लावण्याची पूर्ण तयारी केली आहे. महाजन यांच्या या विधानाने हे स्पष्ट झाले आहे की, भाजपने मुंबईसाठी विशेष रणनीती आखली आहे. ‘मुंबईकरांना आता बदल हवा आहे आणि तो बदल मतपेटीतून दिसेल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

१५ जानेवारीला मतदानासाठी सुट्टी, सवलत नाही? 'या' क्रमांकावर साधा संपर्क

Navi Mumbai Election : "... अन्यथा नाईकांचा 'टांगा' कुठे फरार होईल कळणार नाही", शंभूराज देसाई यांचा इशारा

'लाडकी बहीण'चे पैसे निवडणुकीनंतरच द्या! काँग्रेसचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र

KDMC Election : पहिल्याच दिवशी ३११ कर्मचाऱ्यांनी बजावला टपाली मतदानाचा हक्क

BMC Election : मुंबई फक्त राजकीय आखाडाच आहे का?