मुंबई

गोदरेज समूह विभक्त होतोय!

गोदरेज कुटुंबात दोन गट आहेत. एक गोदरेज इंडस्ट्रीज ॲॅण्ड असोसिएट‌्स‌ आहे. त्याचे नेतृत्व अदि गोदरेज व त्यांचे भाऊ नादिर करतात.

प्रतिनिधी

मुंबई : देशातील मोठा उद्योग समूह गोदरेजची वाटणी होणार आहे. १२६ वर्षे जुना हा भारतीय उद्योग समूह सामोपचाराने विभक्त होणार आहे. वाटणीनंतर गोदरेज ब्रँडचे नाव कोणी वापरायचे यावर परिवारात चर्चा सुरू आहे.

गोदरेज कुटुंबात दोन गट आहेत. एक गोदरेज इंडस्ट्रीज ॲॅण्ड असोसिएट‌्स‌ आहे. त्याचे नेतृत्व अदि गोदरेज व त्यांचे भाऊ नादिर करतात. गोदरेज ॲॅण्ड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे नेतृत्व त्यांचे चुलत भाऊ जमशेद गोदरेज व स्मिता गोदरेज कृष्णा करतात. गुंतवणूक बँकर निमेश कंपनी व कॉर्पोरेट वकील जिया मोदी हे कथितपणे जमशेद गोदरेज यांना सल्ला देत असल्याचे कळते, तर अदि गोदरेज यांना बँकर उदय कोटक व सीरिज श्रॉफ यांची कायदा फर्म अमरचंद मंगलदास ही सल्ला देत असल्याचे समजते. अदि गोदरेज यांचा मुलगा व गोदरेज प्रॉपर्टीजचे अध्यक्ष पिरोजशा गोदरेज हे चर्चेत सामील झाले आहेत.

१८९७ मध्ये अर्देशीर गोदरेज यांनी स्थापन केलेल्या या समूहाचे मूल्यांकन १.७६ लाख कोटी रुपये आहे. हा उद्योग समूह हार्डवेअर, होम अप्लायन्स, इलेक्ट्रॉनिक्स व अंतराळासाठी रॉकेट आदी बाबींचे उत्पादन करतो. कृषी उत्पादने, रिअल इस्टेट, वैयक्तिक निगेची उत्पादने क्षेत्रात कार्यरत आहे.

असे आहे गोदरेज कुटुंबीय

गोदरेज कुटुंबीयांत पाच जण आहेत. त्यात नादिर गोदरेज (अदि यांचे भाऊ), जमशेद गोदरेज, स्मिता कृष्णा (जमशेद यांची बहीण), रिशद गोदरेज (अदि, नादिर व जमशेद यांचे चुलत भाऊ) यांच्याकडे प्रत्येकी १५.३ टक्के हिस्सा आहे. जी ॲँड बी, पिरोजशा गोदरेज फाऊंडेशनकडे २३ टक्के हिस्सा आहे.

जयपूरमध्ये शाळेच्या पाहणीदरम्यान CJP कार्यकर्त्यांवर हल्ला; धक्काबुक्की अन् गाड्यांची तोडफोड, Video व्हायरल

Mumbai : कुर्ल्यात पहाटे मोठी दुर्घटना! क्रेनचा भाग झोपड्यांवर कोसळला; ३ महिन्यांच्या बाळासह १० जण जखमी, VIDEO

ठाण्यातील कोलशेतमध्ये धूळ-माती, चिखलाचा कहर; बड्या विकासकांना महापालिकेचा दणका, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

ST च्या भाडेवाढीचा गणेशभक्तांना फटका; तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

'आम्ही Gen Z...' म्हणत सैनिकांशी वाद घालणाऱ्या 'त्या' तरुणीने मागितली माफी; म्हणाली, "रागाच्या भरात चुकीचे बोलले"