मुंबई

श्रीनिवास मिलच्या कामगारांसाठी आनंदाची बातमी

खोट्या तक्रारींवर सनियंत्रण कमिटीचे चेअरमन यांनी या घरांचा ताबा देण्याबाबत मनाई हुकूम दिला होता.

प्रतिनिधी

बॉम्बे डाईंगच्या स्प्रिंग-टेक्स्टाईल आणि श्रीनिवास मिलच्या ३८९४ कामगारांना लवकरच घरे देण्याचे ठाम आश्वासन म्हाडाचे कार्यकारी अभियंता प्रशांत धात्रक यांनी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या शिष्टमंडळाला गुरुवारी वांद्रे येथील कार्यालयात दिले आहे.

सदर घरांबाबत करण्यात आलेल्या खोट्या तक्रारींवर सनियंत्रण कमिटीचे चेअरमन यांनी या घरांचा ताबा देण्याबाबत मनाई हुकूम दिला होता. परंतु राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि कृती समितीच्या नेत्यांनी या प्रश्नावर सविस्तर खुलासे करून सत्यस्थिती समोर आणली आणि संनियंत्रण कमिटीचे चेअरमन यांनी ही मनाई उठविली. त्याप्रमाणे सोडतीत विजयी ठरलेल्या कामगारांना घरे देण्याची प्रक्रिया सुरु करावी, असा हुकूमही संनियंत्रण समितीने म्हाडाला दिला होता. तरीही म्हाडाकडून घरे देण्यास दिरंगाई केली जात होती. तेव्हा कामगारांना घरे त्वरीत मिळावी यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाने ही तातडीने भेट घेतली.

मुंबई महानगर पालिकेकडून इमारतींना ताबापत्र (ओसी) मिळाले नसल्याचे कळताच राष्ट्रीय मिल मजदूर संघाने पालिका अधिकाऱ्यांचीही भेट घेतली होती. संघाच्या या या एकूण प्रयत्नावर पात्र उमेदवारांची यादी म्हाडाच्या वेबसाईटवर टाकण्यास सुरुवात केली. पालिकेकडून लवकरच ताबा प्रमाणपत्र देण्याबाबत हालचाली सूरु झाल्याचेही म्हाडा अधिकार्यानी शिष्टमंडळाला सांगितले आहे. एकूण या प्रश्नाला गती देण्यात येत असल्याचे म्हाडाने सांगितले.

मोठी बातमी! अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा

"आपण करून दाखवलं!"; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दिपकेंची पहिली प्रतिक्रिया

'तिरंगा मार्च'च्या एक दिवस आधी राज ठाकरेंची पोस्ट; म्हणाले - 'कुठल्याही पक्षाचा झेंडा, नेत्यांच्या घोषणा नको...

CJP Protest : अभिजीत दिपकेंना टायफॉइडची लागण; VIDEO शेअर करत म्हणाले- 'आंदोलन थांबणार नाही'

Ashadhi Ekadashi 2026 : विठ्ठलनामात रंगली पंढरी; पाहा खास क्षणचित्रे