मुंबई

बूस्टर डोस लसीकरणाला राज्यात चांगला प्रतिसाद

प्रतिनिधी

राज्यात सुरू झालेल्या १८ ते ५९ वयोगटासाठीच्या मोफत बूस्टर डोस लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दोन म्हणजेच शुक्रवार आणि शनिवारी तब्बल दोन लाख आठ हजार जणांनी बूस्टर डोस घेतला. काही दिवसांत हा वेग आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये एक हजारापेक्षा जास्त नागरिकांनी लस घेतली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे जुलैपासून लसीकरणाचा वेग कमी झाला होता; परंतु १५ जुलैपासून १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांसाठी मोफत बूस्टर लसीकरण सुरू झाल्याने पुन्हा हे प्रमाण वाढू लागले असून, शुक्रवारी दीड लाख, तर शनिवारी एक लाख ९५ जणांचे लसीकरण झाले आहे. रविवारी शासकीय केंद्रांवर लसीकरण बंद असते. दरम्यान, यामध्ये ५० टक्क्यांपेक्षाही जास्त लसीकरण हे बूस्टर डोसचे आहे. बूस्टर डोसचे शून्य लसीरकरण असलेल्या अकोल्यात एक हजार २९७, भंडारामध्ये एक हजार २११, गडचिरोली १६३, गोंदिया १०४९, हिंगोली ४८४, नांदेड ८८५, परभणी एक हजार १०७, सिंधुदुर्ग एक हजार ४१२, वर्ध्यात एक हजार २९७ आणि यवतमाळमध्ये ९३० जणांनी बूस्टर डोसचा लाभ घेतला.

पुणे विमानतळावर अपघात; 'टग ट्रॅक्टर'ला धडकले एअर इंडियाचे १८० प्रवाशांनी भरलेले विमान

गोल्डन चान्स! या फेमस Electric Scooter वर मिळतोय तब्बल १० हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, जाणून घ्या डिटेल्स

फक्त ६५ हजारात मिळतीये Electric Scooter, चालवण्यासाठी लायसन्सचीही गरज नाही; जाणून घ्या रेंज अन् किंमत

कार्तिक आर्यनच्या नातलगांचा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू, मुंबईत झाले अंत्यसंस्कार

होर्डिंग पॉलिसी लवकरच, तोपर्यंत नवीन होर्डिंगना परवानगी नाही