सेंट अँथनी यांच्या मूर्तीची मिरवणूक काढून वरुण राजाला घातले साकडे; पाऊस लांबल्यामुळे गोराईतील भूमिपुत्रांनी जागवली जुनी परंपरा 
मुंबई

सेंट अँथनी यांच्या मूर्तीची मिरवणूक काढून वरुण राजाला घातले साकडे; पाऊस लांबल्यामुळे गोराईतील भूमिपुत्रांनी जागवली जुनी परंपरा

मुंबईत लांबलेला मान्सून आणि धरणांमधील घटता पाणीसाठा या पार्श्वभूमीवर, गोराईतील मूळ रहिवासी असलेल्या ‘ईस्ट इंडियन’ समुदायाने मंगळवारी एक ऐतिहासिक पाऊल उचलले. कोरड्या पडलेल्या शेतीला पावसाची प्रतीक्षा असल्याने ग्रामस्थांनी सेंट अँथनी यांच्या मूर्तीची रात्री मिरवणूक काढून वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी साकडे घातले.

प्रतिनिधी

मनोज रामकृष्णन / मुंबई

मान्सून लांबल्याच्या बातम्यांवर चर्चा केल्यानंतर ग्रामस्थांनी अचानक हा विधी करण्याचा निर्णय घेतला. या ७५ मिनिटांच्या मिरवणुकीत भाविकांनी पारंपरिक प्रार्थना म्हणत डोक्यावर दगड वाहून नेले. ईस्ट इंडियन समुदायाच्या परंपरेचे अभ्यासक आणि मोबाई गावठाण पंचायतीच्या ‘रीतीन रिवाज’ प्रकल्पाचे प्रमुख वॉल्टर मुर्झेलो यांनी या प्रथेबद्दल अधिक माहिती दिली. मिरवणुकीदरम्यान ‘‘संत अँथॉन सारगन.. पाणी परताय डोंगरान... संत अँथॉन माफी कर... पाणी परा शेतावर’’ (स्वर्गातील सेंट अँथनी... डोंगरावर पाऊस पडत आहे... आम्हांला क्षमा कर आणि आमच्या शेतावर पावसाची कृपा कर) ही पारंपरिक प्रार्थना म्हटली जाते, असे मुर्झेलो यांनी सांगितले.

सेंट अँथनी यांच्या मूर्तीची मिरवणूक काढून वरुण राजाला घातले साकडे; पाऊस लांबल्यामुळे गोराईतील भूमिपुत्रांनी जागवली जुनी परंपरा

पवित्र क्रॉसजवळ थांबून प्रार्थना

ही परंपरा पोर्तुगीज आणि उत्तर कोकण संस्कृतीच्या संगमातून तयार झाली आहे. शतकांपूर्वी जेव्हा मुंबईत प्लेगची साथ आली होती, तेव्हा गावठाणांच्या प्रवेशद्वारांवर 'होली क्रॉस' (पवित्र क्रॉस) उभारण्यात आले होते. या मिरवणुकीत प्रत्येक क्रॉसजवळ थांबून प्रार्थना केली जाते. मुंबई आता चांगल्या पावसाची वाट पाहत असताना येथील भूमिपुत्रांनी पुन्हा एकदा आपल्या पूर्वजांच्या परंपरेवर विश्वास दाखवला आहे.

सेंट अँथनी यांच्या मूर्तीची मिरवणूक काढून वरुण राजाला घातले साकडे; पाऊस लांबल्यामुळे गोराईतील भूमिपुत्रांनी जागवली जुनी परंपरा

दगड पावसाच्या काळ्या ढगांचे प्रतीक

या मिरवणुकीत सुमारे १५० ग्रामस्थ सहभागी झाले होते. मिरवणुकीच्या अग्रभागी सेंट अँथनी यांची प्रतिमा होती, तर मागे चालणारे भाविक डोक्यावर दगड घेऊन चालत होते. हे दगड पावसाच्या काळ्या ढगांचे प्रतीक मानले जातात. स्थानिक कॉन्व्हेंटमधील सिस्टर्सनीही (नन्स) यात सहभाग घेतला.

असा विधी साधारण २५ ते ३० वर्षांपूर्वी करण्यात आला होता. तेव्हा आम्ही लहान होतो. त्यानंतर पाऊस वेळेवर येत असल्याने अशा प्रार्थनेची गरज भासली नव्हती. मात्र, आता पाऊस लांबल्यामुळे पुन्हा अशा प्रकारे विधी करून प्रार्थना करण्याची वेळ आली.
स्विट्सी हेन्रिक्स, पॅरिश कौन्सिलच्या सदस्या, गोराई गावातील मुडण पाखाडीतील रहिवासी

MSRTC Chhava Ride : एकाच ॲपवर मिळणार एसटी, ऑटो, टॅक्सीची सुविधा! 'छावा राईड' लाँचच्या दिशेने मोठं पाऊल; जाणून घ्या सविस्तर

"सुरुवातीपासूनच सरकार आणि यंत्रणा त्यांना वाचवत होती"; बृजभूषण यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर विनेश फोगटची पहिली प्रतिक्रिया

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह निर्दोष; दिल्ली न्यायालयाचा मोठा निर्णय

चितेजवळ मृतदेह तसाच सोडून नातेवाईक जीव मुठीत घेऊन पळाले; अंत्यविधीदरम्यान नेमकं काय घडलं? पुण्यातील Video व्हायरल

LPG ग्राहकांनो लक्ष द्या! 'या' तारखेपूर्वी पूर्ण करा e-KYC; घरबसल्या कशी कराल? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया