मुंबई

गोरेगावला बेस्ट बसची ट्रकला धडक; ८ जण जखमी

गोरेगाव येथे शुक्रवारी सकाळी बेस्ट बसने ट्रकला दिलेल्या धडकेत सहा प्रवाशांसह आठ जण जखमी झाले आहेत.

Swapnil S

मुंबई : गोरेगाव येथे सकाळी बेस्ट बसने ट्रकला दिलेल्या धडकेत सहा प्रवाशांसह आठ जण जखमी झाले आहेत.

शुक्रवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बेस्ट बस दिंडोशीहून शिवडीला निघाली होती. त्यावेळी सर्व्हिस रस्त्यावरून एक कार बसच्या समोर आली. ज्यामुळे बसचालकाला डावीकडे वळावे लागले. तथापि, त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकला धडकली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या अपघातात बसचालक, वाहकासह आठ प्रवासी जखमी झाले. अश्रफ हुसेन, सीताराम गायकवाड, भारती मांडवकर, सुधाकर रेवाळे, पोचिया कानपोची व अमित यादव अशी जखमींची नावे आहेत. या अपघातात बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले, असे पोलिसांनी सांगितले.

बेस्टच्या प्रवक्त्याने सांगितले की, घटनांचा क्रम निश्चित करण्यासाठी आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. ‘प्रवाशांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आम्ही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहोत,’ असे प्रवक्त्याने सांगितले.

Mumbai : पालिका शाळाही ‘गॅस’वर; मध्यान्ह भोजनात आता विद्यार्थ्यांना फळ वाटप, रुग्णालयांत सिलिंडर पुरवठा करण्यासाठी गॅस कंपनीला पत्र

अजित पवारांच्या अपघातातील सत्य सांगा! राष्ट्रवादीच्या सुनील शेळके यांची मागणी

Mumbai : विद्यार्थ्यांच्या नावाखाली कोणाचे भले? शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांचा सवाल; सहलीचा प्रस्ताव राखून ठेवला

उच्च शिक्षण विभागाच्या CET परीक्षांच्या तारखा निश्चित; लवकरच लॉगिनमध्ये हॉल तिकीट उपलब्ध होणार

स्थापत्य समिती शहर शिंदे सेनेकडे; अध्यक्षपदी यामिनी जाधव यांची बिनविरोध निवड