गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्प : पात्र बाधितांना मिळणार ३०० चौरस फुटाचे घर; २५२ बाधितांना मार्चपर्यंत घराचा ताबा  
मुंबई

गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्प : पात्र बाधितांना मिळणार ३०० चौरस फुटाचे घर; २५२ बाधितांना मार्चपर्यंत घराचा ताबा

पूर्व व पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जीएमएलआर प्रकल्पात बाधित होणाऱ्या पात्र सदनिकाधारकांना ३०० चौरस फुटाचे घर मिळेल.

Swapnil S

मुंबई : पूर्व व पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जीएमएलआर प्रकल्पात बाधित होणाऱ्या पात्र सदनिकाधारकांना ३०० चौरस फुटाचे घर मिळेल.

तळ अधिक २३ मजली ७ इमारतीत सभागृह वाचनालयासह सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. गृहनिर्माण प्रकल्प अंतर्गत सुमारे १० हजार ५० चौरस मीटर क्षेत्रफळावरील ७ इमारतींमध्ये ९०६ सदनिकांचे काम प्रगतिपथावर असून मार्चपर्यंत २५२ बाधितांना घराचा ताबा मिळणार आहे. उर्वरित सदनिकांचे बांधकाम ठरलेल्या वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. कांजूर (पश्चिम) येथे गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्प बाधितांसाठी बांधण्यात येणाऱ्या सदनिकांची अभिजीत बांगर यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जूनपासून बोगद्याच्या खोदकामास सुरुवात !

गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्प टप्पा ३ अंतर्गत जून २०२६ पासून बोगदा खनन संयंत्राद्वारे भूमिगत बोगद्यांच्या खोदकामास सुरुवात केली जाणार आहे. तत्पूर्वी, अमर नगर येथे लॉन्चिंग शाफ्टचे काम सुरु होणे अपेक्षित आहे. त्यासाठी जागेची आवश्यकता आहे. अमर नगर येथील प्रकल्प बाधितांचे कांजूर (पश्चिम) येथे पुनर्वसन केले जाणार आहे.

एप्रिलपर्यंत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला अपेक्षित!

प्रकल्पग्रस्त नागरिकांना सुरक्षित व सन्मानजनक निवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा पुनर्वसन उपक्रम राबविण्यात येत आहे. या गृहनिर्माण संकुल परिसरात अंतर्गत रस्ते, मोकळी जागा आणि आवश्यक नागरी सुविधा विकसित करण्यात येत आहे. २ इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून मार्च २०२६ अखेरपर्यंत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळणे अपेक्षित आहे.

Mumbai : १४ फूट उंच झोपड्यांच्या कारवाईवरून विरोधक आक्रमक; काँग्रेस, ठाकरेंच्या शिष्टमंडळांनी घेतली आयुक्तांची भेट

Kolhapur : भरधाव Ertiga ची दुचाकीला जबर धडक; पती-पत्नी थेट हवेत; एकजण जागीच ठार, अंगावर काटा आणणारा Video व्हायरल

समुद्रातील तरंगता कचरा हटवण्यासाठी रोबोटिक बोटी; ३.६ कोटींच्या प्रकल्पाला BMC ची मंजुरी, गेट वे, बधवार पार्क येथील प्रयोग यशस्वी

मुंबई मेट्रो वनची व्यवस्थापन क्षेत्रात भरारी; एकात्मिक आयएमएस-आयएसएमएस प्रमाणपत्र मिळवणारी देशातील पहिली मेट्रो

Mira-Bhayandar : कृत्रिम तलावांतील मूर्तींवर जेसीबीने भराव; पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल