गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाला वेग! 'तुळशी'ने ९ मीटर बोगदा खणला X| mybmc
मुंबई

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाला वेग! 'तुळशी'ने ९ मीटर बोगदा खणला

गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता (जीएमएलआर) प्रकल्पाच्या टप्पा ३ (ब) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली बांधण्यात येणाऱ्या दुहेरी बोगद्यांच्या कामाला वेग आला आहे. गोरेगाव पूर्व येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड पश्चिम येथील अमर नगरदरम्यान ‘तुळशी’ या टनेल बोरिंग मशीनच्या (टीबीएम) माध्यमातून प्रत्येकी तीन मार्गिकांचे दोन बोगदे बांधण्यात येत आहेत.

Swapnil S

मुंबई : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता (जीएमएलआर) प्रकल्पाच्या टप्पा ३ (ब) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली बांधण्यात येणाऱ्या दुहेरी बोगद्यांच्या कामाला वेग आला आहे. गोरेगाव पूर्व येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड पश्चिम येथील अमर नगरदरम्यान ‘तुळशी’ या टनेल बोरिंग मशीनच्या (टीबीएम) माध्यमातून प्रत्येकी तीन मार्गिकांचे दोन बोगदे बांधण्यात येत आहेत. पहिल्या टीबीएमद्वारे प्रत्यक्ष बोगदा खणनाला सुरुवात झाली असून आतापर्यंत ९ मीटर लांबीचे खोदकाम पूर्ण झाले आहे. हे काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

पहिले बोगदा खणन संयंत्र १७ ऑगस्ट २०२६ रोजी कार्यान्वित करण्यात आले. या कामाची पाहणी करण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बुधवारी सकाळी प्रकल्पस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी बोगदा खणनाची कार्यपद्धती, सुरू असलेले खोदकाम, प्रकल्पाची प्रगती आणि विविध तांत्रिक बाबींची माहिती घेतली. बोगदा खणताना कामगारांची सुरक्षितता, यंत्रणेची कार्यक्षमता आणि बांधकामाची गुणवत्ता यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना बांगर यांनी दिल्या. तसेच निर्धारित कालमर्यादेत काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. कामाचा वेग कायम ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात आणि गरजेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालील बोगदा खणनाचे काम अत्यंत तांत्रिक आणि आव्हानात्मक असल्याने सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर बांगर यांनी विशेष भर दिला. प्रकल्पातील प्रत्येक टप्प्यावर सुरक्षितता आणि गुणवत्ता कायम राखण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि प्रकल्प सल्लागार उपस्थित होते.

दुसऱ्या टीबीएमची तयारी अंतिम टप्प्यात!

दुसऱ्या बोगदा खणन संयंत्राच्या सुटे भागांची जुळवाजुळव करण्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. हे काम ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश बांगर यांनी दिले. संपूर्ण यंत्रणा प्रकल्पस्थळी स्थापित झाल्यानंतर तिची कार्यक्षमता, सुरक्षितता आणि सर्व प्रणालींचे एकत्रित कार्य तपासण्यासाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून साइट अॅक्सेप्टन्स टेस्ट सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टीबीएमद्वारे प्रत्यक्ष बोगदा खणन प्रक्रियेचे नियोजन करण्यात येणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नेपाळमध्ये हाहाकार! महापुरात हजारो गेले वाहून, ९५ जणांचा मृत्यू, १३३ भारतीयांसह शेकडो बेपत्ता; नांदेडच्या पर्यटकांचाही समावेश

गरज असेल तरच घराबाहेर पडा; महाराष्ट्रासह २६ राज्यांना १३ तास संकटाचे, हवामान खात्याचा इशारा

नियम तोडाल तर कारवाई होणारच; मुंढेंचा इशारा; सणासुदीत भेसळयुक्त विक्रेत्यांवर FDA ची नजर, नवी नियमावली आज करणार जारी

MPSC Paper Leak: तीन अधिकाऱ्यांसह सहा जण अटकेत; अप्पर सचिव अभिजीत लेंडवे, क्लासचालकही ताब्यात

वेसावे ते भाईंदर फक्त २० मिनिटांत; कोस्टल रोड उन्नत मार्गाचे काम होणार सात टप्प्यांत; वेळेत काम पूर्ण करा - अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश