Mumbai : दुकानदार, झोपडीधारकांना मिळाली मुदत; म्हाडा उपाध्यक्ष जयस्वाल यांचा निर्णय 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : दुकानदार, झोपडीधारकांना मिळाली मुदत; म्हाडा उपाध्यक्ष जयस्वाल यांचा निर्णय

गुरु तेगबहादूर (जीटीबी) नगर पुनर्विकास प्रकल्प परिसरातील दुकानदार, गाळेधारक व झोपडीधारकांना स्वेच्छेने जागा रिकामी करून प्रकल्प उभारणीच्या कामासाठी सहकार्य मिळावे, यासाठी म्हाडातर्फे २० ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : गुरु तेगबहादूर (जीटीबी) नगर पुनर्विकास प्रकल्प परिसरातील दुकानदार, गाळेधारक व झोपडीधारकांना स्वेच्छेने जागा रिकामी करून प्रकल्प उभारणीच्या कामासाठी सहकार्य मिळावे, यासाठी म्हाडातर्फे २० ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदत कालावधीत सहकार्य न करणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर २० ऑक्टोबरनंतर नियमानुसार निष्कासनाची कारवाई करण्यात येणार आहे.

जीटीबी नगर पुनर्विकास प्रकल्प परिसरातील दुकानदार, गाळेधारक व झोपडीधारकांना म्हाडातर्फे ८ ऑक्टोबरला अनधिकृत गाळे निष्कासित करण्याच्या सूचना बजावण्यात आल्या होत्या. मात्र जीटीबी नगर प्रकल्प परिसरातील व्यावसायिक दुकानदार, गाळेधारक व झोपडीधारकांनी आज म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. त्यांनी स्वतःहून जागा खाली करण्यासाठी मुदत देण्यात यावी, अशी विनंती केली. सद्यस्थितीत नवरात्रोत्सव व दसरा सणाचा कालावधी असल्याने संबंधितांच्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून जयस्वाल यांनी यांनी मुदत दिली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nana Patekar Passes Away: 'नटसम्राट' नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, गोव्यात घेतला अखेरचा श्वास

महागाई आणखी वाढणार; चालू आर्थिक वर्षात दर ५.२ टक्क्यांवर जाणार

पुणे-नांदेडमधील 'महाज्योती' व 'वनार्टी'ची परीक्षा ऐनवेळी रद्द; केंद्रावर तांत्रिक गोंधळ, विद्यार्थ्यांचा संताप

...तर ती 'आयात' नाही; रशियन नागरिकाला Thar परत करण्याचे कोर्टाचे आदेश

फडणवीसांच्या भेटीची कंत्राटदारांची मागणी; ८६ हजार कोटींची बिले थकीत