संग्रहित छायाचित्र
मुंबई

हनुमान मंदिर हटविल्याने भाविकांमध्ये नाराजी; पादचारी जागेवर अतिक्रमण, BMC च्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

विलेपार्ले पूर्व, हनुमान नगर येथील सर्व्हिस रोडलगत असलेले पुरातन हनुमान मंदिर अनधिकृत ठरवून रस्ता रुंदीकरणाचे कारण देऊन हटविण्यात आले.

Swapnil S

मुंबई : विलेपार्ले पूर्व, हनुमान नगर येथील सर्व्हिस रोडलगत असलेले पुरातन हनुमान मंदिर अनधिकृत ठरवून रस्ता रुंदीकरणाचे कारण देऊन हटविण्यात आले. स्थानिकांचा विरोध असताना महानगरपालिकेने ३० जानेवारी २०१९ रोजी ही कारवाई केली. मंदिराचा मालमत्ता कर मंदिराचे विश्वस्थ वेळच्या वेळी भरत होते तसेच महानगरपालिकेने या मंदिराचा मालमत्ता कर भरल्याच्या पावत्याही दिल्या असताना हे मंदिर अनधिकृत कसे, असा सवाल येथील स्थानिक विचारत आहेत.

मंदिराच्या जागेवर एका कंपनीचे २५x१० फुटांचे व्यावसायिक कार्यालय थाटले गेले आहे. रस्त्याचे रुंदीकरण न करता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंदिराची जागा एका प्रायव्हेट कंपनीला वापरासाठी दिली असल्याने रस्त्याचे रुंदीकरणही रखडले आहे. मिलन सबवेच्या पुलावरून भरधाव येणाऱ्या वाहनांमधून वाट काढत पादचाऱ्यांना चालवे लागते.

प्राचीन श्री हनुमान मंदिराचा दरवर्षी मालमत्ता कर भरून त्याची रितसर पावती पालिकेकडून दिली जात होती. तसेच सातबारा उताऱ्यावर आणि नकाशावर श्री हनुमान मंदिर असा स्पष्ट उल्लेख आहे. मंदिराला जमीनदोस्त केल्याने भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. महानगरपालिका प्रशासनच्या कारभाराविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार येथील स्थानिकांनी केला असल्याचे संकटमोचन श्री हनुमान मंदिर सेवा मंडळ आणि श्री जय हनुमान एसआरए को. ऑप. हाै. सोसायटीचे (नियोजित) व्यवस्थापक विजय बाईत यांनी सांगितले.

Traffic Challan : ई-चलन भरलं नाही तर वीज बिलात जोडणार दंडाची रक्कम? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा इशारा

२ हजारांवरील UPI पेमेंट शुल्काला स्थगिती देण्यास SC चा नकार; केंद्रासह RBI लाही नोटीस

मोठी बातमी! CJP च्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी नाकारली परवानगी; अभिजीत दिपकेंकडून २ ऑक्टोबरला 'जेल भरो'ची घोषणा

आई धावत मागे आली, पण क्षणात होत्याचं नव्हतं! स्कॉर्पिओने ३ वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

UMANG App : पीएफच्या कामासाठी आता EPFO ऑफिसच्या फेऱ्या नको! घरबसल्या करता येतील ही १० महत्त्वाची कामं