मुंबई

मुंबईत फटाके फोडण्यावरील निर्बंधात हायकोर्टाकडून वाढ; आता फक्त दोनच तास फटाके फोडता येणार

प्रशासनानं फटाक्यांच्या बाबतीत अधिक गंभीर व्हायला हवं - उच्च न्यायालय

नवशक्ती Web Desk

मुंबईसह आजुबाजुच्या परिसरात फटाके फोडण्याच्या वेळेवरील निर्बंधात उच्च न्यायालयाने वाढ केली आहे. हायकोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार आता केवळ रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याची मुभा असेल. यापूर्वी न्यायालयाने सायंकाळी ७ ते रात्री १० अशी पवानगी दिली होती. मुंबई महानगर क्षेत्रातील प्रदूषणाच्या प्रश्नावर हायकोर्टात सुनावणी झाली. हवेची गुणवत्ता न सुधारल्यास दिवाळीत मुंबईतील बांधकामांवर निर्बंध लावण्याचे उच्च न्यायालयाने संकेत दिले होते. त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

प्रशासनानं फटाक्यांच्या बाबतीत अधिक गंभीर व्हायला हवं. बेरीयम धातूच्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचं काटेकोपरणे पालन व्यायला हवं. काही राज्यांनी याबाबत कोड सारखे चांगले उपाय केलेत. मुंबईत याबाबत काय तापसणी सुरु आहे? असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला होता.

मुंबई महापालिकेनं आपलं प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केलं. महापालिका AQI सुधारण्यासाठी करत असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. ज्येष्ठ वकील डॉ. मिलिंद साठ्ये यांनी कोर्टाला याबाबतची माहिती दिली. महापालिका ९५ संवेदनशील ठिकाणी युद्धपातळीवर काम करत आहे. पालिकेचे अधिकारी या ठिकाणांवर जातीनं लक्ष ठेवून आहेत. कोस्टल रोजचं काम करणाऱ्या कंत्राटदारांना देखील निर्देश देण्यात आले आहेत. तिथून निघणारा डेब्रिजचा धूर कुठलाही ट्रक पूर्ण झाकल्याशिवाय बाहेर पडत नाही, असं महापालिकेकडून हायकोर्टाला सांगण्यात आलं.

यावर हे सर्व उपाय करुन तुम्ही मुंबईकरांवर कोणतेही उपकार करत नाही. हे तुमचं कर्तव्यच आहे. तुमच्याकडून यापेक्षा बरंच काही अपेक्षित आहे. असं मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी सुनावलं. यावर राज्य सरकारकडून देखील युक्तीवाद करण्यात आला.

Mumbai : 'मेलोडी रोड'वर निर्बंध; रहिवाशांच्या तक्रारीनंतर BMCचा निर्णय, आठवड्यातील ३ दिवस 'जय हो' बंद

दोन महिन्यांचीच इंधनशिदोरी! केंद्र सरकारचे अखेर इंधन स्थितीबाबत स्पष्टीकरण

बेस्ट बसेसना टोलमाफी द्या! बेस्ट समिती अध्यक्षांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र; पाच वर्षांत ७० कोटींचा टोल भरला

पुण्यात रंगणार 'राडा २०२६'; महाराष्ट्राचा पहिला मराठी पॉप कल्चर फेस्टिव्हल, तरुणांसाठी मोठं व्यासपीठ

कर्करोग रुग्णांसाठी अद्ययावत स्वतंत्र इमारत; १२ ऑपरेशन थिएटर, ३ हजारपेक्षा अधिक बेड्स, फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन