मुंबई

धुक्यासारख्या प्रदूषणाने आरोग्यविषयक चिंता; वायू प्रदूषणाचा अहवाल गंभीर, तज्ज्ञांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मुंबईत अचानक निर्माण झालेल्या धुक्यासारख्या प्रदूषणाने संपूर्ण शहरात आरोग्यविषयक चिंता निर्माण केली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईत अचानक निर्माण झालेल्या धुक्यासारख्या प्रदूषणाने संपूर्ण शहरात आरोग्यविषयक चिंता निर्माण केली आहे. गुरुवारच्या वायूगुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) अहवालात मुंबईतील अनेक भागांमध्ये एक्यूआय ३५०-४०० च्या दरम्यान असल्याचे दाखवण्यात आले आहे. कलीना, चेंबूर आणि भांडुप येथे प्रदूषणाची पातळी गंभीरतेची मर्यादा ओलांडल्याची नोंद आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही स्थिती अधिक धोकादायक असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.

सैफी हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. अबीजर मांकेड यांनी या विषारी धुक्यामुळे गंभीर आरोग्य समस्यांचा इशारा दिला आहे. २६ डिसेंबर २०२४ रोजी जाहीर झालेल्या एका अहवालात मुंबईच्या हवेतील प्रदूषण पातळी अत्यंत चिंताजनक असल्याचे स्पष्ट झाले आहे. वायुगुणवत्तामापन यंत्रणेने शहरातील पीएम २.५ आणि पीएम १० कणांची पातळी ३०० च्या पुढे नोंदवली आहे, जी “अत्यंत धोकादायक” श्रेणीत येते. या धुक्यात नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साइड यांसारखे प्रदूषक देखील आहेत. ज्यामुळे गंभीर श्वसनविकारांचा धोका वाढतो.

गर्भवती महिलांना धोका

“गर्भवती महिलांसाठी धुक्याच्या प्रदूषणाचा धोका अधिक गंभीर आहे. त्यामुळे त्यांच्या गर्भावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे जन्मजात दोष आणि विकास समस्यांची शक्यता वाढते,” असे डॉ. मांकेड यांनी सांगितले.

नागरिकांना सतर्कतेचा सल्ला

डॉ. मांकेड आणि इतर तज्ज्ञांनी नागरिकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. अत्यावश्यक परिस्थितीत बाहेर पडताना चांगल्या दर्जाचा एन-९५ मास्क वापरण्याचा आणि हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचा आग्रह करण्यात आला आहे.

धोक्याच्या गटातील व्यक्तींची वाढती चिंता

अहवालानुसार, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, तसेच कमी रोगप्रतिकारक क्षमता असलेल्या लोकांसाठी हे प्रदूषण प्राणघातक ठरू शकते. प्रदूषणामुळे दीर्घकालीन समस्यांमध्ये हृदयविकार, फुफ्फुसाचा कर्करोग आणि एम्फिसीमा यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. शिवाय, अलीकडील संशोधनात प्रदूषणाचा नकारात्मक परिणाम मानसिक क्षमतेवर होऊ शकतो, असे देखील स्पष्ट झाले आहे.आरोग्यावर दुष्परिणाम

डॉ. मांकेड यांनी सांगितले की, या विषारी धुक्यामुळे डोळे, नाक आणि घशाला होणारी जळजळ ही प्राथमिक लक्षणे आहेत. परंतु, अस्थमा, ब्राँकायटिस किंवा इतर श्वसनविकार असलेल्या रुग्णांची परिस्थिती बिघडू शकते.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video